KINWATTODAYSNEWS

गोकुंदा येथील शिवनेरी गणेश स्थापनेच्या ठिकाणी मुस्लिम बांधवांनी ही लस घेऊन सामाजिक एकात्मतेचे दर्शन घडवून समाजापुढे आदर्श निर्माण केला

किनवट प्रतिनिधी
गोकुंदा येथील शिवनेरी गणेश मंडळ येथे आज कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम घेण्यात आला असून या गणेश मंडळातील सदस्यांसह एकूण चाळीस जणांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली यात प्रामुख्याने एका मुस्लिम समुदायातील व्यक्तीचा समावेश आहे गणेश स्थापनेच्या ठिकाणी मुस्लिम बांधवांनी ही लस घेऊन सामाजिक एकात्मतेचे दर्शन घडवून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.
दरवर्षी प्रमाणे या वर्षीही गोकुंदा येथे शिवनेरी गणेश मंडळाच्या वतीने ठाकरे चौकात श्री गणेशाच्या आकर्षक मुर्तीची स्थापना केली. यानिमित्त शासनाच्या आरोग्य विभागामार्फत सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत आज शिवनेरी गणेश मंडळ येथे कोरोना लसीकरणाचे आयोजन केले होते या मोहिमेला गोकुंदा परिसरातील गणेश भक्तांकडून उत्तम प्रतिसाद लाभला असून दुपारी एक वाजेपर्यंत गणेश स्थापनेच्या ठिकाणी एकूण 40 महिला व पुरुषांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली विशेष म्हणजे या ठिकाणी एका मुस्लीम बांधवानेही कोरोना ची लस घेऊन सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला आहे. गोकुंदा परिसरातील मानाचा गणपती म्हणून शिवनेरी गणेश मंडळाची ओळख आहे गणेशोत्सवाच्या दहा दिवसाच्या कालावधीत गणेश मंडळाकडून विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविले जातात या वर्षीही वेगवेगळी उपक्रम राबविणार असल्याची माहिती शिवनेरी गणेश मंडळाचे अध्यक्ष अनिल ईरावार यांनी यावेळी दिली.
या वेळी लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी शिवनेरी गणेश मंडळाचे अध्यक्ष अनिल ईरावार सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी रामकिशन गेडाम अडव्होकेट दिनानाथ दराडे, प्रशांत कोरडवार, नितीन मोहरे, राजू शिंदे,पप्पू कर्णेवार, रोहित भिसे, कपिल जाधव स्वप्निल कोटपेट , पंकज जाधव, गणेश कर्णेवार, राम वानखेडे, आदींनी सहकार्य केले तर वैद्यकीय अधीक्षक उत्तम धुमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.मोहन गोणेवार यांनी नागरिकांना लस दिली ए. एन.एम.संजीवनी सरपे एल.ए. बी. धम्मपाल दवणे लक्ष्मीकांत वाकोडे यांनी त्यांना सहकार्य केले

162 Views
बातमी शेअर करा