अल्टीमेट संपला… आता पुतळा बसवा …..मातंग समाजाचा विद्रोही टाहो
——-
———————————————————–
नांदेड:-
कंधार तालुक्यातील मौजे गऊळ येथील मातंग समाजावर झालेल्या अमानुष लाठीचार्जची सखोल चौकशी होऊन दोषीवर कारवाई व्हावी.साहित्यसम्राट अण्णाभाऊसाठे यांचा हटवलेला पुतळा सन्मानाने बसवण्याचे जिल्हाधिकारी यांनी दिलेले आश्वासन पुर्ण करणे.तसेच मातंग समाजाच्या तरूणांवर दाखल झालेले गुन्हे तात्काळ मागे घेण्याबाबत.या मागण्यासाठी कंधार तहसिल कार्यालयासमोर सकल मातंग समाजाचे विद्रोही धरणे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाला कंधार तालुक्यातील हजारो समाजबांधव उपस्थित होते.या आंदोलनात अल्टीमेट संपला, आता पुतळा बसवा, असा मातंग समाजाने विद्रोही टाहो फुटला. आंदोलनानंतर विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार, कंधार यांना दिले.या आंदोलनाला बहुजन समाजातील अनेक नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दि.३१ ऑगस्ट रोजी मौजे गऊळ ता.कंधार येथील साहित्यसम्राट लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या नियोजित पुतळ्याच्या जागेवरती गावातील सर्वच बहुजन समाजाच्या वतिने विचारविनिमय व संगणमत करून सदर जागेवरती साहित्यसम्राट लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा बसविण्यात आला.त्यादिवशी गावात जातीय सलोखा व शांतता कायम होती. परंतु येथील समाजकंटकांनी पोलीस प्रशासनस हाताशी धरून मौजे गऊळ येथील मातंग समाजाच्या घरात घुसुन समाजाचे तरूण,महिला,वृध्द व विविध ठिकाणाहुन आलेल्या समाजबांधवावर अमानुष लाठीचार्ज केला.सदर मातंग समाजावरील भ्याड हल्याचा व निषेध करणारे आम्ही सह्या करणारे तरूण कार्यकर्ते व समाज बांधव करत आहोत. सदर प्रकरणात लाठीचार्ज प्रकरणाची सीआयडीकडून सखोल चौकशी करून कारवाई करावी. जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी जिपच्या मुख्याधिकारी वर्षा ठाकुर, जिल्हा पोलिस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांच्याा उपस्थित मातंग समाजासोबत शांतता समितीची बैठक बोलावली. या बैठकीत नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण हे व्हीडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उपस्थित होते.जिल्हाधिकार्यांनी सहा दिवसात महामानव साहित्यसम्राट अण्णाभाऊसाठे यांचा हटवलेला पुतळा सन्मानाने बसवून देण्याचे आश्वासन समाज बांधवांना दिले होते. मा.जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी.मातंग समाजाच्या तरूणांवर केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत. गऊळ प्रकरणाची सीआयडी चौकशी करून आरोपींविरूध्द जात प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करावी.पुणे येथे झालेल्या मातंग समाजाच्या मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार करणार्यांवर कडक कार्यवाही करून मातंग समाजाला न्याय द्यावा.अन्यथा येणार्या काळामध्ये सदर घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रभर जनआंदोलन छेडण्यात येईल.याची दखल घ्यावी, असे या निवेदनात नमूद केले आहे.या निवेदनाच्या प्रति उपविभागीय अधिकारी,
जिल्हाधिकारी, नांदेड यांनाही देण्यात आल्या आहेत.या निवेदनावर सकल मातंग समाज व बहुजन समाजातील नेते, कार्यकर्ते यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
सदरील मागण्यांस बसव ब्रिगेड, संयुक्त ग्रुप, रेड पँथर, वंचित बहुजन आघाडी, भारतीय जनता पक्ष, मानवहित लोकशाही आघाडी, लहूजी शक्ती सेना, बंजारा समाज आघाडी, संभाजी ब्रिगेड, कोळी महासंघ,लोकस्वराज्य आंदोलन, अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन आदींचा पाठिंबा आहे.