किनवट/प्रतिनिधी: बळीराम पाटील कला,वाणिज्य व विज्ञान महाविदयालय किनवट तथा द युनिक अकॅडमी पूणे यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले.
…सदर शिबीर प्राचार्य डाक्टर एस.के.बेंबरेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले.अकॅडमीचे प्रा. इंद्रजित यादव यांनी पदवी काळात यूपीएससी एमपीएससी स्पर्धां परीक्षांची तयारी कशी करावी या विषयावर सखोल मार्गदर्शन केले, सदरील शिबीरात ३३ विदयार्थी यांनी सहभाग घेतला, यावेळीं उपप्राचार्य डाक्टर गजानन वानखेड़े यांनी शुभेच्छा संदेश देवून मार्गदर्शन केले. प्रास्ताविक, मार्गदर्शकाचा परिचय व संचलन प्रा. आनंद भालेराव समन्वयक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यांनी केले. आभार
प्रा. सुलोचना जाधव सह समन्वयक यांनी मानले,याप्रसंगी पर्यवेक्षक प्रा. अनिल पाटील,प्रा. डाक्टर पंजाब शेरे,प्रा. मंदाकिनी राठोड,प्रा. शिल्पा सरपे,प्रा. शेषराव माने प्रामुख्याने उपस्थित होते,याप्रसंगी युनिक अकॅडमी नांदेड चे समन्वयक प्रा. राहुल देशमुख यांनी युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा वर्ग व प्रवेशाविषयी माहिती दिली. शिबीर यशस्वितेसाठी प्रा. चंद्रकात खराटे,सचिन सर,प्रा. संतोष पवार ,प्रा. कुणाल राठोड यांनी परिश्रम घेतले,वैशाली आढाव,प्रतिक मोहूरले या विद्यार्थ्यानी प्रश्न विचारले,प्रा. यादव सरानी समाधानकारक उत्तरे दिली.
बळीराम पाटील कला,वाणिज्य व विज्ञान महाविदयालय किनवट तथा द युनिक अकॅडमी पूणे यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर संपन्न
146 Views