किनवट/प्रतिनिधी
धुळे, नंदुरबार ,अकोला ,वाशिम, पालघर व नागपूर येथील निवडणुका शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे जाहीर झाल्या. जर या आघाडी सरकारने वेळीच इम्पेरिकल डेटा कोर्टाला दिला असता तर आज आमच्या ओबीसी बांधवावर निवडणुकीतून हद्दपार करण्याची वेळ आली नसती. पण या शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या काळातओबीसीचे आरक्षण जाणून-बुजून काढून घ्यायचे होते म्हणून त्याने कोर्टाला इम्पेरियल डेटा दिला नाही व ओबीसीचे आरक्षण संपुष्टात आले म्हणजे या सरकारने मागासवर्गीय आयोग नेमून सुद्धा कुठल्याही कारवाई केली नाही फक्त आणि फक्त ओबीसी समाजाला आशेवर ठेवून पद्धतशीरपणे निवडणुकीतून बाजूला केले . म्हणून ह्या सरकारचा ओबीसी समाजाच्या वतीने व भारतीय जनता पार्टी ओबीसी विभागाच्या वतीने जाहीर निषेध व पुढे ओबीसी समाजाने शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेस निवडणुकीत हद्दपार करून या सरकारला त्यांची जागा दाखवून द्यावी. सदर निवेदना मार्फत आम्ही विनंती करतो की.जोपर्यंत राज्यातून आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येऊ नये अशा प्रकारचे निवेदन राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना किनवटचे आमदार भीमराव केराम, भाजपाचे तालुका अध्यक्ष संदीप केंद्रे, ओबीसी सेलचे नांदेड जिल्हा अध्यक्ष बाबुराव केंद्रे नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, शेखर चिंचोळकर (तालुका अध्यक्ष भाजपा ओबीसी सेल शिवा क्यातमवार शहरध्यक्ष भाजपा ओबीसी सेल आदी मान्यवरांच्या सह्या निवेदनावर आहेत.
जोपर्यंत राज्यात आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येऊ नये-भाजप किनवट तर्फे निवेदन
119 Views