किनवट:(तालूका प्रतिनिधी)
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना असे पर्यंत कंत्राटी कर्मचार्यांना सेवा हमी संरक्षण देण्यात यावे अशा प्रकारची विनंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना किनवट – माहूर विधानसभेचे आमदार भीमराव केराम यांनी दि. 13 रोजी एका पत्राद्वारे केली आहे.
पत्रात महाराष्ट्र या योजनेचा जनक असून ग्रामीण विकासाचा आत्मा आहे. ग्रामीण विकासाचा आत्मा म्हणून याकडे पाहिले जाते. परंतु आज राज्यात या योजनेची स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात आली नाही. 10 ते 14 वर्षापासून कंत्राटी कर्मचारी या योजनेची यशस्वी अंमलबजावणी करत असून सुद्धा खाजगी कंत्राटदाराकडून या सेवा घेण्याचा अन्यायकारक कारक निर्णय रोहयो विभागाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधकारमय होणार आहे.
ज्याप्रमाणे मा. उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद यांचे मार्फत न्याय निर्णयानुसार कृषी विभागातील आत्म कर्मचाऱ्यांना योजना असे पर्यंत कार्यरत ठेवण्यासाठी संरक्षण देण्यात आले आहे. मा. उच्च न्यायालय गुजरात त्यांनी दिलेल्या निर्णय नुसार सुद्धा रोहयो कर्मचारी योजना असेपर्यंत कर्मचाऱ्यांना संरक्षण दिले आहे. त्याचप्रमाणे राज्यातील कर्मचाऱ्यांना सुद्धा ही योजना असेपर्यंत संरक्षण देण्यात यावे. परंतु राज्याच्या रोहयो विभागाकडून कर्मचाऱ्यांची जबाबदारी टाळून खाजगी कंत्राटदार नेमण्याचा निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांची एक प्रकारे पिळवणूक केली जाणार आहे. असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. असं न करता 10 ते 14 वर्षापासून योजनेत कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सामावून घ्यावे तसेच या पूर्वी मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे योजना असेपर्यंत कामावर कार्यात ठेवण्याचे सेवाहमी संरक्षण देण्याचा लोकप्रिय निर्णय घ्यावा अशी विनंती हीआमदार भीमराव केराम यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करण्यात आली आहे.
रोहयो कंत्राटी कर्मचाऱ्यांना संरक्षण द्यावे – आ.भीमराव केराम यांची मागणी ;‘आत्मा’ कर्मचाऱ्यांना लाभ तर रोहयो व कर्मचारी उपेक्षित.
349 Views