किनवट : येथून दक्षिणस ४ किमी अंतरावर असलेल्या कोठारी ( चि ) पुलावरील स्लॅब तुदून पडलेले भगदाड त्वरीत बुजवावे, ये जा करणाऱ्या प्रवाशांची जीवित हानी टाळावी, अन्यथा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंता कार्यालयास टाळे ठोकुन शिवसेना स्टाईल अंदोलन छेडले जाईल. असा इशारा दिशा समिती सदस्य मारोती सुंकलवाड यांनी दिला आहे.
तालुक्यातील कोठारी (चि ) नाल्यावर बारमाही प्रवास करण्यासाठी कायम स्वरूपी उंच पुल व्हावा ही अनेक वर्षापासून मागणी आहे. परंतु सिमेंट पाईप अंथरून त्यावर स्लॅब टाकून कसाबसा पुल सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेला आहे. शनिवारपेठ, पार्डी, बोधडी (खु ), येंदा -पेंदा अशा अनेक गावांसाठी हाच मुख्य मार्ग आहे. थोडाजरी पाऊस झाला तरी या पुलावरून पाणी जातं, त्यामुळे अनेकांना ताटकळत थांबावं लागतं. मागच्या झडीत या पुलावरील स्लॅबला मोठे भगदाड पडले. वाहते पाणी असतांना पुलावरुन प्रवास करणाऱ्या दुचाकी,चार चाकी वाहनचालकास तसेच पायी प्रवास करीत पुल पार करणाऱ्या प्रवाशास हे भगदाड सहजा सहजी दिसत नाही . त्यामुळे या भगदाडात वाहन आडकुन किंवा पडुन जिवीत हानी होऊ शकते . हा संभाव्य जिवघेणारा धोका टाळण्या करीता तुटलेले भगदाड तात्काळ दुरुस्त करून प्रवाशांची गैरसोय तात्काळ दुर करावी. अन्यथा आपल्या किनवट येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंता कार्यालयास टाळे ठोकुन शिवसेना स्टाईल अंदोलन छेडले जाईल . याची गांभीर्याने नोंद घ्यावी . असे निवेदन नांदेड जिल्हा विकास समन्वयक सनियंत्रण ( दिशा ) समितीचे सदस्य तथा ज्येष्ठ शिवसैनिक मारोती कानबाराव सुंकलवाड, शिवसेना शहर प्रमुख संतोष येलचलवार, युवासेना तालुका प्रमुख प्रमोद केंद्रे यांनी सार्वजनिक बांधकाम मंडळ नांदेडचे अधिक्षक अभियंता यांना दिले आहे.
तसेच निवेदनाच्या प्रती हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंतभाऊ पाटील , नांदेडचे जिल्हाधिकारी , किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी, भोकरचे कार्यकारी अभियंता , सा.बां.उपविभाग किनवटचे उपअभियंता. पोलिस ठाणे किनवटचे पोलीस निरीक्षक यांना पाठविल्या आहेत.
कोठारी ( चि ) पुलाचा स्लॅब तुटुन पडलेले भगदाड तात्काळ बुजवावे व जिवीत हानी टाळावी अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन- मारोती सुंकलवाड
84 Views