देगलूर : शहरात आज परमवीर चक्र प्राप्त शहिद जवान कॅप्टन अब्दुल हमीद यांच्या नियोजित स्मारक येथे
१९६५ मध्ये झालेल्या भारत- पाक युद्धामध्ये शहीद झाले अब्दुल हमीद यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार मंगेश कदम यांनी देशभक्त शहिद जवान अब्दुल हमीद यांचे स्मारक प्रत्येक ठिकाणी असावे असे प्रतिपादन केले.
या प्रसंगी देगलूरचे माजी नगरसेवक शत्रुघ्न वाघमारे यांनी स्मारकासाठी जागा उपलब्ध करून देणारे अफाट लोकप्रियतेचे धनी नगराध्यक्ष मोगलाजी अण्णा शिरशेटवार यांचे आभार मानले.यावेळी पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड,देगलूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्याम वद्देवार,संजय महाराज किरजवळेकर,बळवंत गजभारे,पि. जी. ठाकूर, अशोक डोंगळीकर, ऋषिकेश बनसोडे,धमरत्न,धीरजकुमार वाघमारे,बालाजी काळे,आकाश बिल्लाळीकर इत्यादिसह अनेकजण उपस्थित होते.
देगलूर शहरात शहिद जवान अब्दुल हमीद यांच्या पुण्यतिथी निमित्त मंगेश कदम यांनी केले अभिवादन
389 Views