नरसी ;नरसी सर्कल प्रतिनिधी( मारोती सूर्यवंशी)
नरसी शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रामतिर्थ पोलिसांनी शुक्रवारी पथसंचलन केले आहे. यावर्षीचा देखील गणेशोत्सव हा अत्यंत वेगळ्या पद्धतीने आणि शासनाने घालून दिलेल्या कारोना संदर्भात नियम व अटीनुसार पार पडणार आहे, त्याच पार्श्वभूमीवर रामतिर्थ पोलिसांनी पथसंचलन करत कायदा-सुव्यवस्थेकडे आपलं विशेष लक्ष असणार आहे असं अप्रत्यक्ष रित्या सांगितल आहे.
रामतिर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नरसी चौक, दत्त मंदिर, बालाजी मंदिर, आदित्य गार्डन, दुध डेअरी असा रूटमार्च काढण्यात आला. यावेळी रामतिर्थ पोलिस ठाण्याचे सपोनि विजय जाधव, पोलीस उपनिरीक्षक लतीफ शेख सह १० पोलिस कर्मचारी, १५ होमगार्ड उपस्थित होते.
नरसी चौक हा मुख्य केंद्रबिंदू असल्याने परिसरात नेहमीच पोलिसांना सक्रीय राहावं लागतं. आज दि.१० सप्टेबर रोजी गणेश आगमनाच्या पार्श्वभूमीवर नरसी सह नरसी सर्कल परिसरातील सर्व गाव आणि रामतिर्थ पोलिस ठाणे हद्दीतील लोहगाव, आदमपुर, रामतिर्थ, बिट मधील नागरिकांनी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन रामतिर्थ पोलिस ठाण्याचे सपोनि विजय जाधव यांनी केले आहे. नियमांचे पालन न केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल असंही ते म्हणाले.