किनवट/प्रतिनिधी:
स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे चौक हे गोकुंदा शहराची ची शान असलेले ठिकाण आहे. परंतु या चौकात घाणीच्या साम्राज्यात मच्छर, डुकरे यांचा उच्छाद मांडला आहे.या ठिकाणाहून नागरिक व कोचिंग क्लास साठी आलेली लहान मुले आपले नाक दाबून धरून या ठिकाणाहून प्रवास करत आहेत.
याच चौकात गोकुनद्यांतील मोठी बाजारपेठ आहे.तसेच किनवट तालुक्यातील सर्वात जास्त कोचिंग क्लासेस असल्यामुळे तालुक्यातील विद्यार्थी या कोचिंग क्लास मध्ये शिकण्यासाठी येत असतात. पहिली ते पदवीपर्यंतचे सर्व क्लासेस याठिकाणी चालतात. तसेच अनेक अकॅडमीज या ठिकाणी असल्यामुळे येथे क्लासेस साठी तालुका भरातून युवक वर्ग येत असतो.
परंतु या ठिकाणांची घाण ही काही नवीन नाही अनेक वर्षापासून या पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होत नसल्यामुळे येथे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तरीही ग्रामपंचायत च्या आता पर्यंत च्या कोणत्याही सरपंच,उपसरपंच, ग्रामसेवक पदाधिकाऱ्यांना या घाणीचे काहीएक वाटत नाही. निर्लज्जपणे या ठिकाणाहून ते ये-जा करत आहेत परंतु याकडे कोणीही ढुंकून पाहायला तयार नाही.तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे.त्यामुळे करोडो रुपये चा फंड येथे विकासासाठी मिळत असताना ही घाण जैसे थे आहे. पंचायत समितीच्या सभापती नी या कडे लक्ष देणे गरजेचे आहे.
या ठिकाणचे सर्व दुकान चालक यांनी अनेक वेळा अर्ज विनंत्या केल्या, पत्रकारांनी अनेक वेळेस बातम्या दिल्या परंतु या निर्लज्ज प्रशासनाला आतापर्यंत जागच आली नसल्याचे येथील दुकानदाराने सांगितले. त्यामुळे या ठिकाणांच्या दुकान मालकांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्याला धडा शिकविण्यासाठी या साचलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्याने अंघोळ करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते त्यासाठी मोठे आंदोलन उभे करणार असल्याचे एका दुकानदाराने बोलून दाखवले.