( राजेश पाटील किनवट)-९ सप्टे.
मागील उत्तर प्रदेश मधील हातरस प्रकरण घडून काही महीनेच उलटले आहे तरी भारताची राजधानी असलेल्या दिल्ली येथे सिव्हील डिफेन्स मध्ये कर्तव्यदक्ष पोलिस राबिया सैफी या युवतीवर सामुहीक बलात्कार व हत्या झाल्याने देशभरात खेद व्यक्त केल्या जात आहे व काळ्या फिती लावून निषेध केत्या जात आहे या प्रकरणी ती पण एक भारताची बेटी होती ,माणुसकीच्या नात्याने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र किनवट संघठनेच्या वतीने मा. तहसिलदार डॉ. मृणाल जाधव यांना निवेदन सादर करण्यात आले या वेळी नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख आनंद भालेराव , आशिष शेळके, नसीर तगाले, राजेश पाटील, राज माहुरकर, विशाल गिमेकर, गंगाधर कदम, प्रणय कोवे, मारोती देवकत्ते, रमेश परचाके संघटनेचे विविध पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.
80 Views