किनवट प्रतिनिधी: लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर मागील चार ते पाच महिन्यांपासून सर्व व्यवहार खुले करण्यात आले असले तरीही मागच्या दोन वर्षापासून राज्य सरकारने मंदिरे खुली करण्याबाबत कोणत्याही हालचाली केल्या गेल्या नाहीत देवां प्रति भाविक भक्तांची असलेली श्रद्धा तसेच मंदिरावर विसंबून असलेल्या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न लक्षात घेऊन शासनाने तात्काळ सर्व मंदिरे खुली करावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दिनांक 14 सप्टेंबर रोजी तीर्थक्षेत्र माहूरगड येथे आई रेणुकामाता मंदिराच्या पायथ्याशी घंटानाद आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट यांच्यामार्फत आज मनसेच्या वतीने निवेदन सादर केले असून निवेदनात म्हटले आहे की मागील तीन-चार महिन्यांपासून किनवट माहूर तालुक्यातच नव्हे तर राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे त्या पार्श्वभूमीवर सरकारने लॉक डाऊन चे नियम शिथिल करून सर्व प्रकारच्या व्यवहारांना काही नियम व अटी सह परवानगी दिली आहे बाजार पेठ, शासकीय कार्यालय, खाजगी कार्यालय, दुकाने व आस्थापने सुरू झालेली आहेत त्याचबरोबर दारू दुकानांना देखील सूट देण्यात आली मात्र मंदिरे खुले करण्याबाबत शासनाकडून कोणतीही हालचाल होताना दिसून येत नाही. निर्बंधाच्या काळात राजकीय पक्षाचे नेते मंत्री तसेच आमदार हे बिनधास्तपणे लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करून मोर्चे,आंदोलने,संपर्क दौरे, मेळावे भरवत आहेत मात्र त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही केल्या जात नाही याउलट सामान्य नागरिकांना मात्र निर्बंधाच्या कारणावरून कठोर कार्यवाही केली जात आहे नव्हे तर त्यांच्याकडून दंड देखील वसूल केला जात आहे विशेषता हिंदूंच्या सण व उत्सवा वेळीच सरकार कडून निर्बंध घातले जात असल्याने जनतेच्या देवावरील श्रद्धा व भावनेला ठेस पोहोचवण्याचे काम शासन करत आहे राज्य सरकार कोरोना निर्बंधावरून भेदभाव करत असल्याचा आरोप मनसेने केला असून राज्यातील जनतेची ईश्वराप्रती असलेली आस्था व श्रद्धा लक्षात घेऊन तसेच मंदिरावर विसंबून असलेल्या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचा विचार करून महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मुख्य पीठ असलेल्या माहूरगड येथील श्री रेणुकामाता मंदिरासह सर्व मंदिरे तात्काळ खुली करावीत या प्रमुख मागणीसाठी मनसेच्या वतीने 14 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता किनवट मनसेचे मा.तालुकाध्यक्ष नितीन मोहरे यांच्या नेतृत्वात आई रेणुका देवी मंदिराच्या पायथ्याशी घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे
निवेदनावर मनविसेचे मा.माहूर तालुकाध्यक्ष गजानन कुलकर्णी,माजी.शहराध्यक्ष राम दातीर, अनिल इरावार ,प्रसाद भंडारे, रोहित भिसे,बाबू जाधव, गणेश कर्णेवार, वैभव कदम,संतोष पाटील कऱ्हाळे राजू डोलारकर, प्रदीप दोनकोंडवार, अजय मंत्रीवार, चंद्रकांत तंम्मडवार, वैभव गंधे, आशीष बाळसकर, गौतम वाघमारे, आकाश पवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत
मंदिरे सुरू करण्याच्या मागणीसाठी माहूरात 14 सप्टेंबर रोजी मा.तालुकाध्यक्ष नितीन मोहरे यांच्या नेतृत्वाखाली मनसे करणार घंटानाद आंदोलन
165 Views