किनवट : हिंगोली लोकसभा मतदार संघातील हिंगोली, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात मागील चार दिवसापासून होत असलेल्या संततधार पावसामुळे अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी केंद्रीय कृषी,आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलास चौधरी यांच्याकडे केली आहे.
परतीच्या मान्सूनने मागील चार दिवसापासून हिंगोली लोकसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन खरिपाच्या कापूस,सोयाबीन, ज्वारी, मूग उडीद , सह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . या पार्श्वभूमीवर खासदार हेमंत पाटील यांनी मतदार संघातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी आणि इतर मागण्याकरिता केंद्रीय कृषी,आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री
कैलास चौधरी यांची दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी उभयंता मध्ये लोकसभा क्षेत्रातील इतर शेती प्रश्नाबाबत चर्चा झाली. यासोबतच खासदार हेमंत पाटील यांनी हिंगोली,नांदेड, यवतमाळ जिल्हा प्रशासनाला पत्रव्यवहार करून पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत . हिंगोली लोकसभा मतदारसंघातील हिंगोली, कळमनुरी ,वसमत , सेनगाव , औंढा नागनाथ तर नांदेड जिल्ह्यातील हदगाव, हिमायतनगर आणि किनवट, माहूर या व यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड , महागाव तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे . तसेच काही ठिकाणी नदीनाल्यांचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने महामार्गवरील वाहतूक सुद्धा ठप्प झाली आहे तर अनेक गावांचा संपर्क तुटला असून अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. एकंदरीत परतीच्या मान्सूनने हाहाकार उडवला असल्याचे चित्र लोकसभा क्षेत्रात पाहावयास मिळत आहे निसर्गाच्या लहरीपणामुळे मतदारसंघातील शेतकऱ्यावर दरवर्षी अनेक संकटे ओढवत आहेत.शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी खासदार हेमंत पाटील सातत्याने केंद्र आणि राज्य सरकार कडे पाठपुरावा करून मागण्या मंजूर करून घेत असतात.हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या सर्वागीण विकासासाठी आपण सदैव तत्पर असल्याचे खासदार हेमंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.मागील चार- पाच दिवसापासून होत असलेल्या पावसाने थैमान घातले असून यामुळे हजारो हेक्टर वरील खरीप पिकाचे नुकसान झाले आहे तर अनेक ठिकाणी नदीनाल्यांचे पाणी शेतात घुसून जमिनीचे सुद्धा नुकसान झाले असून अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली आहेत.
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना केंद्राने आर्थिक मदत करावी ; केंद्रीय कृषिराज्यमंत्र्यांकडे केली खासदार हेमंत पाटील यांनी मागणी
129 Views