नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
*नांदेड*:दि.9. जिल्यातील धर्माबाद तालुक्यामधील रामेश्वर येथील गायराण जमीन प्ररकरणात तात्कालीन तलाठी सय्यद मुर्तुजा, तात्कालीन मंडळ अधिकारी बी.डी.पवळे व वादग्रस्त मंडळ अधिकारी नामदेव माळोदे यांच्यावर नियमानुसार निलबंनाची कार्यवाही झाली असून जिल्हाधिकारी यांनी त्यांनी आजपर्यंत केलेल्या कामकाजाची विभागीय चौकशी करणार असल्यामुळे तालुक्यातील अनेक तलाठी भयभीत झाले असून चौकशीमुळे अनेक गैरकारभार उघडकीस येणार असल्यामुळे गायराण जमीन प्ररकरणात झालेली कार्यवाही सुडबुध्दीने व राजकीय दबावामुळे झाली असल्याचे षडयंत्र तलाठी संघटनेने रचवित प्रशासनावर दबाव तंत्राचा वापर करीत असल्याचे चित्र दिसत आहे. सदरील केलेली कार्यवाही मागे घेण्यात यावे,अनथा नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात संघटनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा तहसिलदार दत्तात्रय शिंदे व उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके यांना तलाठी संघटनेच्या वतीने सोमवारी एका लेखी निवेदनाद्वारे देण्यात आले आहे. सदरील निवेदन दिल्यानंतर उलट्या चोरांच्या बोंबा या म्हणीप्रमाणे तलाठी संघटनेचे कार्य सुरू असल्याची चर्चा तालुक्यातील जनतेत होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, धर्माबाद तालुक्यातील रामेश्वर येथील गायराण जमीन प्ररकरणात उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके यांनी प्रार्दशकपणे सुनावणी लावून बारकाईने कागदपत्रांची तपासणी केली असता,सदरील प्ररकरणातील कागदपत्रे संशायास्पद आढळून आल्यामुळे आणखी बारकाईने कागदपत्रांची तपासणी केल्यामुळे सदरील प्ररकरण उघडकीस आले आहे.व नियमानुसार जिल्हाधिकारी यांनी दोषींवर निलबंनाची कार्यवाही करून विभागीय चौकशी करण्याचे ठरविल्यामुळे सदरील विभीगीय चौकशीत अनेक तलाठ्यांचे व मंडळ अधिकाऱ्यांचे गैरकारभार उघडकीस येणार असल्यामुळे तलाठी संघटनेचे धाबे दणाणले आहेत.धर्माबाद तालुक्यातील अनेक तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी सगनमत करून तुकडेबंदी व तुकडेजोड तसेच गुंठेवारी कायद्यातील नियमांचे उलग्नं करून नियमबाह्य पद्धतीने मालमत्तेचे नोंदी व फेरफार केल्या आहेत.सदरील प्रकरणामुळे शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडाला आहे.परंतु तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी सदरील प्ररकरणात आपले लाखो रुपयांचे चांगभले करून घेतले असल्याची चर्चा तालुक्यातील जनतेत होत आहे.तसेच शंभर रूपयांच्या शपथपत्रावर नियमबाह्य पद्धतीने मालमत्तेचे फेरफार करण्यात आले आहे.व सदरील फेरफारच्या आधारावर शेकडो मालमत्तेचे दस्तनोंदणी करण्यात आले आहे.तसेच तालुक्यातील वनविभाग,वक्फ बोर्ड व देवस्थानच्या जमीनीचे नियमबाह्य पद्धतीने तलाठ्यांनी फेरफार करण्यासाठी नोंदी घेतल्या असून संबंधित मंडळ अधिकाऱ्यांनी सदरील घेतलेल्या नोंदी मंजूर केल्या आहेत.त्यामुळे विभागीय चौकशी झाल्यास तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांचे आजपर्यंत केलेले गैरकारभार उघडकीस पडणार असल्यामुळे सदरील प्रकरणे उघडकीस पडूनये, यासाठी तलाठी संघटनेने प्रशासनावर दबाव तंत्राचा वापर करीत असल्याचे महसूल विभागातील एका अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे.गायराण जमीन प्ररकरणातील कार्यवाही सुडबुद्धीने व राजकीय दबावामुळे झाली असल्याचे आरोप तलाठी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.व सदरील केलेल्या कार्यवाहीचा साहनुभुतीपूर्वक विचार न केल्यास तलाठी संघटनेनी ठरविल्याप्रमाणे नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आंदोलन करण्याचा लेखी इशारा तहसिलदार दत्तात्रय शिंदे व उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके यांना तलाठी संघटनेच्या वतीने लेखी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. सदरील निवेदनावर महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेचे उपविभागीय अध्यक्ष एन.आर.गाजेवार,तलाठी संघटनेचे अध्यक्ष कदम बी.जी, जिल्हा सहसचिव सहदेव बासरे, सचिव अंबेराय एल.बी,तलाठी उल्हास आडे,तलाठी वर्षा कुलकर्णी, सचिन उपरे,बी.बी.लोणे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.सदरील प्ररकरणावरून तलाठी संघटनेचा व प्रशासनाचा वाद निर्माण झाला आहे.परंतु गायराण जमीन प्ररकरणातील दोषी स्वतःला वाचवण्यासाठी तलाठी संघटनेचा गैरफायदा घेत आहेत.त्यामुळे दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल केल्यास कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिल,अशी चर्चा तालुक्यातील जनतेत होत आहे.