किनवट ता.प्र दि ०८ जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा चिखली (बु) ता. किनवट येथिल मुख्याध्यापक राजेश्वर जोशी यांना गावातील गावगुंड प्रवृत्तीचा इसम शिवाजी गोविंदराव पवार याने विनाकारण शाळेत वाद घालत अर्वाच्य भाषेत शिविगाळ करत झापड मारली असल्याची तक्रार मुख्याध्याप जोशी यांनी किनवट पोलिस स्टेशन मध्ये नोंदवली असुन त्याचा क्रमांक भां.द.वी ३५३, २९४, ३२३, ५०६ प्रमाणे गु.र.न ०२८३/२०२१ नोंद करण्यात आला असुन आरोपी फरार झाला आहे.
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा चिखली (बु) येथिल मुख्याध्यापक राजेश्वर जोशी हे शालेय कामकाज करत असतांना आरोपी शिवाजी गोविंदराव पवार हा शाळेवर आला आणी शाळेतील शिक्षकांच्या उपस्थिती बाबत वाद घालत असतांना अर्वाच्य भाषेत शिविगाळ करणे सुरु केले त्या नंतर मुख्याध्यापक जोशी यांनी त्यास काय माहिती पाहिजे ती अर्ज करा मी लिखित देतो असे सांगितल्या नंतर त्यांने त्यांना मारहाण केली. आरोपी शिवाजी गोविंदराव पवार याचा शाळेशी कसलाही संबध नाही त्याचे पाल्य देखिल शाळेत नाही त्यामुळे त्याला शाळे बाबत काही तक्रार करायची असल्यास त्याने गटशिक्षणाधिकारी व गटविकास अधिका-याकडे तक्रार करायला हवी होती त्याने असे गैरकृत्य करुन कायदा हातात घेऊन मुख्याध्यापकावर हात उगारयला नको होते. असा सुर सर्व सामान्य नागरीकांमधुन व्यक्त करण्यात येत आहे.
सदर प्रकरणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटने तर्फे गटशिक्षणाधिकारी किनवट यांच्याकडे निवेदन सादर करुन आक्रमक भुमिका घेतली आहे तर अशा गुंडप्रवृत्तीच्या इसमा विरुध्द कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे व आरोपीला जर अटक झाली नाही तर शाळाबंद आंदोलन करण्याची भुमिका घेतली आहे. सदर निवेदनावर महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी ग.णु. जाधव, राजकुमार बाविस्कर, सुदर्शन येरावार, राष्ट्रपाल वाकोडे, फहिम खान, आत्माराम मुखाडे, मुकुंदा अभंगे, संतोष शेंडे, विष्णु अंबेकर, शिवन्ना गोस्कुलवार, रमेश कागणे, प्रकाश नालमवार, अकबर मोमीन, धनाजी कांबळे, रमेश मरखेलकर, मल्लीकार्जुन स्वामी, राजेश्वर जोशी, प्रदीप पवार, योगेश वैदय यांच्या स्वाक्ष-या आहेत. किनवट शहरात राजेश्वर जोशी हे अत्यंत सोज्वल व सहकार भावनेचे व्यक्ती म्हणुन परिचित आहेत त्यांच्या सोबत झालेल्या घटनेने प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत आहे.
चिखली(बु.) मु.अ. मारहाण प्रकरणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटने तर्फे गटशिक्षणाधिकारी किनवट यांच्याकडे निवेदन सादर -आरोपीस अटक न झाल्यास शाळा बंद करणार!
760 Views