7 सप्टेंबर अमरावती:
गेल्या ३ दिवसांपासून विदर्भात मुसळधार पाऊस कोसळतो आहे . त्यामुळे विदर्भात विशेषता अमरावती जिल्ह्यातील विविध प्रकल्पात प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढतो आहे. अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असा आवाहन महिला बालविकास मंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांनी केले आहे. अमरावती व वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर असलेलं बगाजी सागर धरण सद्या ९४.४३% भरलेलं आहे. त्यामुळे या धरणाचे मंगळवारी सकाळी १० वाजता ३१ दरवाजे ४५ सेमीने उघडण्यात आलेत. सद्या बगाजी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग होतोय.१३०७ क्यूसेक्स पाणी नदीपात्रात सोडलं जात आहे. या धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग होत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये शेत पिकांचे आणि मालमत्तेचं नुकसान झालं होतं. त्यामुळे यावेळी नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगावी असही ठाकूर यांनी सांगितले आहे
अमरावतीच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी – एडवोकेट यशोमती ठाकूर
96 Views