नरसी:नरसी सर्कल प्रतिनिधी मारोती सूर्यवंशी
गेली दोन दिवसापासून सतत धार पावसामुळे राज्यासह,नांदेड जिल्ह्यातील अनेक मंडळात अतिवृष्टीने मानवी जीवन विस्कळीत झाले.
काल झालेल्या मुसळधार पावसामुळे नरसी व परिसरात चोहीकडे पाणीच, पाणी झाले.आणि हजारो हेक्टर पीक क्षेत्रावर त्याचा परिणाम झाला. परिणामी हातातोंडाशी आलेली पिके पाण्यात गेली त्यामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले असून,नरसी शहरात या पावसाचा सर्वाधिक फटका सामान्य नागरिक तसेच व्यापारी मंडळींवर बसला.
केवळ के. टी कंपनीच्या अक्षम्य चुकीमुळे आणि तलाठी, मंडळ अधिकारी यांचा पंचनामा केला जात नाही व कसलाही उपाय केले जात नाही त्यामुळेच
तर नरसी शहर पूर्णतः जलमय झाले, व नर्सितील ओढे नाले तलाव यांना पुर आलेला आहे,मुखेड रोड महामार्गावरील ओढ्याला पूर आल्याने व पाणी पुलाच्या कठड्यावरून वाहत होते त्यामुळे वाहतूक दोन तास पूर्णतः बंद होती.तर इकडे महेबुब नगर,दत्तनगर, बालाजी नगर, साठेनगर,सावित्रीबाई फुले नगर, आंबेडकरनगर नवीन अबादी , मुखेडंरोड वर असणारे विठ्ठल रुक्मिणी मंदिर या भागात
घरा घरात पाणी शिरून अनेक संसाराची राखरांगोळी…..तर नरसी चौकातील संपूर्ण मार्केटमधील दुकानात पाणी घुसून लाखो रुपयांची नुकसान झाले. या पावसाने वाहतूक दोन तास ठप्प होती वाहनाच्या रंगाचं रांगा लागल्या होत्या. एकांदरित एकदम भारी प्रसंग होता.नरसी येथील मार्केट, यार्ड दुकानात आणि घरात जे काही पाणी घुसून लाखो रुपयांची नुकसान झाले लोकांचे संसार उधवस्त झाले
या सर्व गोष्टीला फक्त आणि फक्त के. टी.इन्स्फ्राक्चर चे अर्धवट अवस्थेत असलेल्या नाली बांधकाम,जवळ जवळ तीन कोटी रुपयांची नाली बांधकाम पूर्ण झाले नाही.
आज के. टी कंपनीच्या अक्षम्य चूकिमुळे काल ,आज,आणि, उद्या परत नरसी जलमय होणार !
गावात अनेक पक्ष्याची नेते मंडळी असून ,लोकप्रतिनिधी आणि ग्राम पंचायत चे प्रतिनिधित्व करणारे लोक गप्प का ? असा प्रश्न नागरिकांना पडतो आहे.कधी आम्ही ह्या समस्येतून मुक्त होऊ शकतो या विचारात व्यापारी व गावकरी मंडळी आहेत.तसेच यातून मुक्ती नाही मिळाल्यास येणाऱ्या काळात नरसी येथील व्यापारी आणि गावकरी यांनी आक्रोश आंदोलन करू असा इशारा देण्यात आला.