KINWATTODAYSNEWS

गौळ घटनेचा निषेध करून दोषींविरुद्ध कठोर शासन करावे. या मागणीचे निवेदन समाज बांधव व लसाकम अहमदपूर शाखेच्या वतीने प्रशासनास देण्यात आले

अहमदपूर: गऊळ ता.कंधार येथे जातीय मानसिकतेच्या लोकांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा हटवून तेथील समाज बांधवावर पोलीसांनी अमानुष अत्याचार केला आहे. या घटनेचा अहमदपूरात निषेध व्यक्त करून दोषींविरुद्ध कठोर शासन करावे. या मागणीचे निवेदन समाज बांधव व लसाकम अहमदपूर शाखेच्या वतीने प्रशासनास देण्यात आले. या प्रसंगी समाजातील जेष्ठ कार्यकर्ते व लसाकमचे पदाधिकारी आदीं उपस्थित होते.

74 Views
बातमी शेअर करा