ता. प्र. किनवट :-
कृषी प्रधान संस्कृती मधील महत्वाचा सण बैल पोळा हा किनवट मध्ये हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. दरवर्षी प्रमाणे हनुमान मंदीर परीसरात व सिद्धार्थ नगर येथील बौद्ध विहारात पावसाच्या सरी मध्ये पोळा सण साजरा झाला या वेळी किनवट येथील वरीष्ठ नागरीक, महिला , बाल बालीका पोळा सणात सहभागी झाले होते तसेच शिवाजी चौकात विविध प्रकारचे खेळण्याचे दुकान थाटली होती या मुळे लहान बच्चे कंपनीचा पारावार उरला नव्हता आज वातावरण पावसाचे असल्यामुळे सर्व जण भीजत तर काही जण छत्र्या घेऊन सणात सहभागी झाले होते .
किनवट तालुक्यात पोळा हा सण उत्साहात साजरा पोळा सण साजरा करत असताना बैल हा आजचा मुख्य आकर्षण असतो सकाळपासूनच सर्जा-राजाला धुने, पोहू घालने व सजवन्यात अख्खा दिवस जातो सायंकाळी सजलेल्या बैलांना घेऊन सर्वजण हनुमान मंदिरासमोर(पारासमोर)जमतात.
बैल पोळ्याचा मान असलेला मानकरी रांगेत उभे असलेल्या बैलाची पाय धुऊन कुंकू लावून पूजा केल्यानंतर बैलाला निवद खाऊ घातल्या जाते. शेवटी आरती ने व मंगलाष्टका ने बैलपोळ्याचा समारोप होतो पाराला बैल फिरल्यानंतर घरी गेल्यावर त्याची पूजा केली जाते आजचा हा सण शेतकरी उत्साहात साजरा करतात
लोणी झेंडीगुडा,मांडवा येथे ही पोळा हा सण उत्साहात साजरा करण्यात आला पोळा उत्सवाचे मानकरी पावडे बंधु यांनी बैलाची पूजा करून बैलांना निवद चारून पोळा सण हसत-खेळत वातावरणात पार पडला.
कृषी प्रधान संस्कृती मधला महत्वाचा दिवस बैल पोळा सण किनवट येथे उत्साहात साजरा
116 Views