KINWATTODAYSNEWS

बऱ्याच दिवसांपासून ऐकण्यात, वाचनात नी अवतीभवती पाहण्यात येते की, मातंग समाजावर नियमित अन्याय होतो आहे..जीवे मारण्याची धमकी, हल्ला, लाठीमार,डोकी फोडणे ,स्त्री,मुले, वृध्द यांना त्रास देणे . नको ते प्रकार घडताना पहायला मिळतात.. कारण काय तर इथली समाजव्यवस्था, जातीयवादी गुंडगिरी… कारण काय तर आमचे मागासलेपण, गरीबी नी अशिक्षित पणा.. म्हणतात ना बळी तो कान पिळी..तेच घडत.. खेड्यातील मातंग समाज म्हणजे अशिक्षित,गरीब, मोलमजुरी करणारा , राबराब राबणारा नी स्वतःला पाटील समजून पाटिलकीच्या रुबाबात मिरवणाऱ्याला पाटील पाटील म्हणणारा…
मातंग समाजावर ह्या पाटील, मराठा समाजाकडून घोर अन्याय होत आला आहे.. कारण मांग म्हणजे दलीत , अस्पृश्य..मांगांनी मांग म्हणून जगावं… पाटील पाटील म्हणत मरावं हा इथला जातीवाद..मांगानं शिकावं, स्वाभिमानी बनावं त्यांनी प्रगती करावी हे इथल्या जातीयवादी समाजव्यवस्थेला, पाटील, मराठ्यांना अजीबात खपत नाही.. यांच्या घरा, शेतात राबून लाचारी करावी हीच यांची धारणा… शिकून सावरुन चांगले राहू लागले की यांना ते खपत नसे..मग पाणी भरणे, शेताच्या बांधावरुन, शेळ्या,मेंढ्या, गुरेढोरे नको त्या कारणावरून नुसती कळ काढायची नाही तर जीवे मारणे, बहिष्कार टाकणे, जाळपोळ करणे, गावाबाहेर काढणे यापेक्षाही भयंकर प्रकार नियमित घडतात..
गावात बोटावर मोजता येतील इतकेच दहा,वीस घरे नी मागासलेपण हे त्यांच खरं कारण.. पाटलांला, मराठ्यांना आरंतुरं बोलने आणि त्याचा बदला घेणे .. त्यांच्या वर उलट वार करणे हे मांगांना जमलंच नाही..
यांच्या पाठीशी ना कोणता अधिकारी,ना कोणता आमदार,खासदार, मंत्री ..यांची ना दाद ना फिर्याद.. उलट प्रकार दाबण्यात, दडपशाही करण्यात सारे पटाईत…
पण हे किती दिवस चालू द्यायचे…आरे मांगांनो भाल,सुरी घेऊन तुम्ही चामडी सोलायला सुरुवात केली तर कोणतंही गाढव तुमच्या वाटेला कधीच येणार नाही.. त्यासाठी बाबासाहेबांची शिकवण,दिलेला मूलमंत्र ध्यानी ठेवा, अंगीकार करा…शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा…
संघटनेची ताकद सर्वांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.. तुमच्या वर होणाऱ्या अन्यायाचे कारण च तुमची दूर्बलता आहे… ताकद निर्माण करण्यासाठी शिक्षण, संघटन हवे, मातंग समाज आर्थिक दृष्ट्या प्रगत होणे गरजेचे आहे.. विशेषतः मातंग तरुणांनी आपली प्रगती साधणे आवश्यक आहे.. गरीबी, लाचारी सोडून स्वाभिमानी झालं पाहिजे.. राजकारणात पुढे येवून समाजाचे आमदार, खासदार, मंत्री झाले पाहिजे आणि त्यांनी इमानेइतबारे समाजाला न्याय मिळवून दिला पाहिजे.. समाजाचे जे कोणी अधीकारी, पदाधिकारी, राजकारणी असतील ते समाजाकडे अजीबात लक्ष देत नाहीत.. समाजाबद्दल मुळीच अस्मिता नाही म्हणून हे सारं घडताना दिसतं… भावांनो भिऊन चालत नाही .. कायदा आहे..सरळ सरळ ॲट्रॉसिटी दाखल करा.. कायदा आपल्या रक्षणार्थ आहे..कायद्याचे ज्ञान नी त्याचा वापर होणे आवश्यक आहे… वेळीच गुन्हा दाखल करुन गुन्हेगाराला शिक्षा दिल्यास गुन्हेगारी संपल्या शिवाय रहाणार नाही जशास तसे उत्तर द्या.. संघटन नी ताकद निर्माण करा…
मातंग समाजासाठी इतर समाज ही कधी रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळत नाही… उलट भांडवल करून दिशाभूल केली जाते..आपला धर्म काढला जातो.. आपल्यात विष पेरल्या जाते.. धर्मांतराचे धडे दिले जातात… त्यांना ही मी म्हणेन या होणाऱ्या अन्यायात तुमची साथ काय.?.. मातंग समाजाच्या भल्यासाठी, न्यायासाठी काय, कुणाचं योगदान आहे.?.का या समाजाला आपलं म्हणून कोणी धाऊन येत नाही.?.का कोणी मदत करत नाही.?.का तुम्ही न्याय मिळवून देत नाही.?.का तुम्ही मातंगाला आपलं मानत नाही…? गोष्टी धर्माच्या नको कर्माच्या हव्यात. मातंग समाजावर दररोज होणाऱ्या अन्याय अत्याचारात आपली भूमिका काय.?..मी काय केले?.नी काय पाहिजे याचा विचार प्रत्येकाने च करावा.. प्रश्न मातंग समाजाच्या धर्मांतराचा नाही…या समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराचा नी तुमच्या योगदानाचा आहे… मातंग समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराचे मूळ कारण इथली, समाजव्यवस्था, शासनव्यवस्था नी न्यायव्यवस्था असून या समाजाच्या पाठीशी कोणी खंबीरपणे उभे राहणारे दिसत नाही हेच आहे..या गोष्टीचा विचार मातंग समाजाने नव्हे तर इतर समाजानेही करणे गरजेचे आहे…
यापुढे मातंग समाजाची भुमिका काय असेल ते ही महत्त्वाचें आहे…
संघटीत मातंग समाज बदल घडवून आणल्याशिवाय राहणार नाही… मातंग तरुण संघटीत होतोय.. दिवस नक्की पालटतील.. मातंग जागा होतोय..

जय अण्णा ! जय लहुजी !

गायकवाड आर.जी.दापकेकर
९८३४२९८३१५

949 Views
बातमी शेअर करा