किनवट(आनंद भालेराव)
शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तथा नांदेड जिल्हा नियोजन समिती सदस्य ज्योतिबा दादा खराटे यांचा 7 सप्टेंबरला वाढदिवस असून प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी त्यांच्या मूळ गावी अंजनखेड येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत रक्तदानाची वेळ ठेवण्यात आली आहे. तरी याची रक्तदात्यांनी नोंद घ्यावी असे आवाहन आयोजन समितीने केले आहे .गेल्या अठरा वर्षांपासून अविरतपणे ज्योतिबा दादा खराटे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य असे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते आज पर्यंत 4250 रक्ताच्या बाटल्या नांदेड जिल्ह्यातील रेकॉर्डच म्हणावे लागेल. वाढदिवसानिमित्त दुसरे कोणते कार्यक्रम न ठेवता रक्तदानाचेमहान कार्य त्यांच्याकडून घडत असते त्यामुळे जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या संधीचा फायदा घेऊन रक्तदान करावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.