KINWATTODAYSNEWS

किनवट या आदिवासी अतिदुर्गम भागातील नुकत्याच पुरात वाहुन गेलेल्या तिन व्यक्तीच्या कुटुंबियांना आज १२ लाखांची मदत -खा.हेमंत पाटील व आ.केराम यांच्या हस्ते प्रदान

किनवट ता.प्र. दि. ०१ राज्यातले महाविकास आघाडी सरकार हे जनतेच्या हितासाठी तत्पर आहे किनवट या आदिवासी अतिदुर्गम भागातील नुकत्याच पुरात वाहुन गेलेल्या तिन व्यक्तीच्या कुटुंबियांना आज १२ लाखांची मदत देण्यात येत आहे. किनवट तालुक्यातील काही मंडळामध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये शेतपिकाचे नुकसान झालेल्या शेतक-यांना तत्काळ पंचनामे करुन तातडीने मदत मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करणा आहोत मागील दोन वर्षापासुन रखडलेले किनवट नांदेड या राष्ट्रीय महामार्गाच्या काम तिन महिण्यात पुर्ण होणार या संदर्भात आज केंद्रीय मंत्री नितिन गडकारी सह संबधित विभागाच्या गुत्तेदाराशी चर्चा झाली आहे अशी माहिती आज किनवट दौ-यावर असतांना खा. हेमंत पाटील यांनी पत्रकाशी बोलतांना दिली. यावेळी खा.हेमंत पाटील व आ. भिमराव केराम यांच्या हस्ते तिन मयतांच्या वारसांना अर्थ सहाय्याचे धनादेश वाटप करण्यात आले.
आज दिनांक ०१ सप्टेंबर रोजी हिंगोली लोकसभाचे खासदार हेमंत पाटील हे किनवट माहुर विधानसभा दौ-यावर आले असतांना पत्रकाराशी संवाद साधतांना सागितले दिनांक २४ ऑगस्ट रोजी तालुक्यातील शिवणी येथिल पाच महिला एक पुरुष पुरात वाहुन गेले होते त्यातील चौघांना वाचवण्यात आले त्यातील दोन महिला प्रेमलाबाई लच्छना तम्मलवाड वय ६७ वर्ष रा. शिवनी व महअली रज्जाक आगुवाड वय ६२ वर्ष या दोघींचा मृत्यु झाला होता व मांडवी मंडळातील कोठारी सी येथिल अक्षय प्रधान वय १८ वर्ष हा तरुन दिनांक १८ ऑगस्ट रोजी पुराच्या पाण्यत मृत्यु झाला होता आज या तिघांच्या नातेवाईकांना किनवट तहसिल कार्यालयात खा. हेमंत पाटील , आ. भिमराव केराम यांच्या हस्ते व तहसिलदार डॉ मृणाल जाधव यांच्या उपस्थितीत प्रत्येक ४ लक्ष रुपये प्रमाणे धनादेश वाटप करण्यात आले.
यावेळी बोलतांना खा. हेमंत पाटील यांनी सांगितले मी दौ-यावर असतांना मागील दोन दिवसापुर्वी इस्लापुर, सावरी, कोपरा या परिसरात ढगफुटी सदृष्य पावसामुळे शेतक-यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाल्याने शेतक-यांच्या नुकसानीची पाहणी करुन शेतक-यांना तातडीने मदत मिळवुन द्या असे त्यांनी तहसिल विभागाला सुचना दिल्या तर मागील दोन वर्षापासुन रखडलेले राष्ट्रीय महामार्गाचे काम व बंद होणार मार्ग हि सर्व समस्या घेऊन संबधित गुत्तेदार , यावरील अभियंते यांच्याशी चर्चाकरुन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याशी भ्रमनध्वनी वरुन चर्चा करुन रखडलेले काम पुर्ण करण्याची विनंती केली. त्यांची या अडचणी दुर करुन दिवाळी पुर्वी हा रस्ता पुर्ण करुन असे आश्वासन केंद्रीय गडकरी नितिन गडकरी यांनी दिले असल्याने खा हेमंत पाटील यांनी सांगितले त्यांनतर त्या दौ-यात त्यांनी नुकतेच निधन झालेले कॉग्रेस पक्षाचेज्येष्ठ नेते स्व.किशनराव किनवटकर, सेवानिवृत्त वनाधिकारी नारायण कटकमवार व मजुर सोसायटीचे चेअरमन हनमंतराव दडगेलवार यांच्या कुटूंबियांची भेट घेऊन त्यांचे सात्वन केले व किनवट शहरात डेंग्युने थैमान घातले असता आरोग्य विभागाच्या अधिका-या सोबत चर्चा केली यावेळी त्यांच्या समवेत उपजिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटे, माजी जि.प अध्यक्षा जनाबाई डुडुळे, ता. अध्यक्ष बालाजी मुरकुटे शहराध्यक्ष सुरज सातुरवार, माजी नगराध्यक्ष सुनिल पाटील, भाजपाचे ता अध्यक्ष संदिप केंद्रे, भाजपा नेते अनिल तिरमनवार, बालाजी आलेवार, गजानन बचेवार, भाऊराव राठोड, मारोती सुंकलवाड, खासदार यांचे स्विय सहाय्यक सुनिल गरड पाटील, निळकंठ कातले यांच्यासह भाजपा व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

115 Views
बातमी शेअर करा