*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.1.जिल्यातील धर्माबाद नगर पालिकेच्या वतीने ठाणे महानगरपालिकाच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे या आपले कर्तव्य बजावत असताना एका माथेफिरू कडून त्यांच्यावर हल्ला झाला व यात त्यांची हाताची बोटे कापली गेली,तसेच डोक्यास देखील मोठी जखम झाली आहे.आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावणाऱ्या एका महिला अधिकाऱ्यावर झालेला हा भ्याड हल्ला अत्यंत संतापजनक आहे.
गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जेंव्हा कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ले करतात,तेंव्हा अश्या प्रकारच्या भ्याड हल्ल्याने केवळ हल्ला झालेला अधिकारीच न्हवे तर संपूर्ण प्रशासनाचे मनोधैर्य खच्ची होते. त्यामुळे अश्या प्रकारच्या हल्ल्याचा संघटित निषेध करणे आणि हल्लेखोरांवर कठोर कारवाई करणे हाच यावरील उपाय आहे.
त्यामुळे या घटनेचा निषेध म्हणून आज परळी नगरपरिषदेचेमुख्याधिकारी नीलम कांबळे,कार्यलयीन अधीक्षक.श्री.केंद्रे,तुगेंवार,मोकले,मारोती उल्लेवाड,नागेश उपोड,रमेश घाटे,लखमावाड,खटके,मनोज टाक,किशन सोनकांबळे,गंगाधर सुरेवंशी,धावणे,घाटे मॅडम,सुरेवंशी राजरत्न,सर्व कर्मचारी,अधिकारी वर्गाने काळ्या फिती लावून निषेध करत कामकाज सुरु ठेवले आहे,यात सर्वांनी सहभाग आपला निषेध म्हणून नोंदवाला.