अर्धापूर: शहरामध्ये मोठ्या प्रमाणात डेंग्युचा प्रभाव वाढतांना दिसुन येत आहे. त्याच प्रकारे शहरापाठोपाठ आता गावामध्ये पण डेंग्युची साथ पसरत असताना दिसत आहे. त्यामुळे अनेक रुग्ण दवाखान्यात उपचारासाठी जातांना दिसत आहेत. दाभडमध्ये पावसाच्या पाण्यामुळे अस्वच्छता निर्माण झाल्यामुळे ग्रामस्थांना डेंग्युचा रोग लवकरच होण्याची दाट शक्यता आहे. या अस्वच्छतेमुळे गावामध्ये डेंग्युचा आजार मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. गावामध्ये पाण्याने साचलेले गटार, खड्डे, नाले उघडे असुन, घाणीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असतांना दिसुन येत आहे. तरी त्या घाण पाण्यामुळे डेंग्युचे मच्छर मोठ्या प्रमाणात वाढण्याची शकता आहे. दाभड ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक व सरपंच यांचे दुर्लक्ष असल्याचे दिसुन येत आहे. असेच दुर्लक्ष राहीले तर डेंग्युचा आजार पसरुन गावातील लोकांचे आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी दाभडमध्ये डेंग्यु सारखा आजार रोखण्यासाठी लवकरच फाॅगींग मशिनद्वारे फवारणी करण्यात यावी. अशी मागणी ग्रा.पं.सदस्य आकाश सुर्यवंशी यांनी ग्रामसेवक बी.पी कापसे यांच्याकडे केली आहे. त्यावेळी ग्रा.पं.सेवक प्रकाश दादजवार, ऑपरेटर गणेश तारडे, पा.पु.सेवक बंडु टेकाळे, व्यंकटी सुर्यवंशी उपस्थित होते.
ग्रामपंचायत मार्फत डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दाभडमध्ये फाॅगींग मशीनद्वारे फवारणी करण्यात यावी. – ग्रा.पं.सदस्य आकाश सुर्यवंशी यांची मागणी
59 Views