किनवट (प्रतिनिधी) किनवट तालुक्यातील मांडवा येथून एक किलोमीटर परिसरात मांडवा येथील शेतकरी गजानन रामराव केंद्रे यांच्या बैलावर वाघाने हल्ला करून त्यास ठार मारले.या वृत्ताने संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वन विभागाने त्या वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. सदरचे वृत्त लिहीपर्यंत पंचनामा व त्या संबंधित कार्यवाही झालेली नव्हती.
631 Views