नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
जिल्यातील धर्माबाद येथील suprshiअपुऱ्या झोपेमुळे युवा पिढीवर शारीरिक व मानसिक दुष्परिणाम होत असून ऑनलाइन गेमचे हे परिणाम असल्याचे प्रतिपादन धर्माबाद चे सुप्रसिद्ध डॉक्टर प्रवीण कांबळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले.
आज घडीला स्मार्टफोनने फार मोठी क्रांती घडवली असली तरी त्याचे दुष्परिणामही तेवढेच आहेत. कारण युवा पिढी ही ऑनलाईन गेम्सच्या विळख्यात अडकलेली आहे.सदरील ऑनलाईन गेम्स मध्ये आर्थिक जोखीमही भरलेली आहे.
लालसेपोटी युवा पिढी ही रात्री उशिरापर्यंत ऑनलाईन राहण्याचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे त्यांच्यावर शारीरिक व मानसिक दुष्परिणाम ओढवत आहेत.
18 ते 25 वर्ष वयातील काही युवक अस्वस्थ वाटत आहे म्हणून माझ्याकडे आले होते त्यांची दिनचर्या मी विचारले असता सदर बाब स्पष्ट झाली.अशा या तरुणांना उच्चरक्तदाबाचा त्रास सुरू झाला असून भविष्यात त्याचे हृदयावरही मोठे परिणाम होणार आहेत.
ऑनलाइन गेम मुळे झोपेचं प्रमाण खूपच कमी झाले आहे.व विविध आजारांनी तरुणांना ग्रासले आहे.त्यामुळे भविष्यात आपले आरोग्य अबाधित राखावयाचे असेल तर झोप आवश्यक आहे आणि झोप आवश्यक असेल तर स्मार्ट फोन बाजूला ठेवा.त्याचा योग्य वेळी योग्य प्रसंगीच वापर करा.असे आवाहनही डॉक्टर प्रविण कांबळे यांनी आजच्या ऑनलाईन गेम्सच्या विळख्यात अडकलेल्या युवापिढीला केले.