KINWATTODAYSNEWS

प्रत्येक गावात दिव्यांगानी दिव्यांग होने का गम नहि!हम किसी से कम नही!! हे दाखविण्यासाठी दिव्यांगानी आपली शक्ती तयार करावी -डाकोरे पाटील

अर्धापुर :-
तालुक्यातील मालेगाव येथे दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या यांच्या नेतृत्वाखाली व दिव्यांग वृध्द निराधार यांच्या अनेक प्रश्नासाठी मेळावा संपन्न झाला.
मेळाव्याचे अध्यक्ष रयत क्रांति संघटना मराठवाडा अध्यक्ष ग्रा प सदस्य मालेगाव येथील संगीता कोल्ले होत्या
अध्यक्ष व प्रमूख पाहुणे यांचा सत्कार करून मेळाव्यास सुरूवात करण्यात आली.

प्रस्ताविक किसन खुर्दामोजे यांनी दिव्यांग मेळाव्याचा उद्देश व दिव्यांग बांधवांच्या अडचणीत संघटनेने शासन स्तरावर कशी सोडवणूक करीत आहे त्यासाठी आपले सहकार्य महत्त्वाचे असल्यामुळे सर्वानी संघटित होण्याचे अव्हाहण केले.

जि अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले यांनी दिव्याग बाधवानी संघटितपणे नांदेड जिल्ह्यात शासन प्रशासन यांना जागे करण्यासाठी शंभर सनदशीर आंदोलन केल्यामुळे आज दिव्यांग बांधवाना गाव पातळीवर सवलती मिळत आहेत
त्यासाठी सर्वानी संघटित संघर्षात सहभागी व्हावे असे आवाहन केले

संस्थापक अध्यक्ष मा.डाकोरे पाटिल यांनी दिव्यांगाच्या चाळीससवलती मिळण्यासाठी गाव तिथ दिव्यांग संघटनेच्या बोर्डाचे शाखा स्थापन
केल्यास दिव्यांग बांधवांचा हक्काचा पाच टक्के निधी ची चोरी होनार नाहि, व दिव्यांना कोणीहि ञास दिला जात नाही श
शासन प्रशासन व जनतेला कळेल कि दिव्यांग बांधवांची संघटना असल्यामुळे त्यांचा हक्क व ञास दिल्यास दिव्यांग कायदा 2016 प्रमाणे क्षिक्षा होईल हि भिती व दिव्यांग बांधव आपल्या हक्कासाठी जागा आहे संघटित आहे यांची जाणिव व्हावी म्हणून आज आपल्या गावात बोर्डाचे शाखा स्थापन करून दिव्यांग बाधवानी संघटितपणे संघर्ष केल्याशि़वाय न्याय मिळत नाही.दिव्यांगानी आपल्या शरीरातील व्यंग असल्यामुळे खचित न होता, हक्क मिळत नाही म्हणून आत्महत्या करू नये दिव्यांग बुध्दीने चातुर्य असुन त्या बुध्दी चा वापर करून दिव्यांग होने का गम नहि हम किसी से कम नहि हे दाखवून देण्यासाठी संघटितपणे संघर्षात सामिल होऊन आपली शक्ती निर्माण करून दिव्यांग बांधवांना ग्रामपंचायत, पचायत समिती,जिल्हा परिषद, नगरपंचायत ,नगरपालिका
महानगरपालिका, खासदार, आमदार निधी, घरकुल, अपंग शिष्यृती ईत्यादी चाळीस सवलतीसाठी आपण संघटितपणे संघर्ष करण्यासाठी सहभागी व्हावे असे आव्हान डाकोरे पाटिल यांनी केले .यांनी केले .
अध्यक्षीय समारोप संगीता कोल्हे यांनी दिव्यांगाना ग्रा प चा निधी मिळावा म्हणून मी प्रयत्न केला पण ग्रामसेवक यांच्या कडून प्रतिसाद मिळत नसल्याने मि माहिती चा अधिकार मार्फत माहिती मागितली तरी दोन महिन्यात माहिती मिळाली नसल्याने मी दुसरे अपिल पंचायत समिती कडे अपिल केले असून माझ्यासारख्याना न्याय मिळत नसेल तर तुम्हा दिनदुबळ्याना न्याय संघटित झाल्याशिवाय मिळणार नाही म्हणून आपल्या साठी सतत संघर्ष करणारे डाकोरे पाटिल यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे रहा मी सुध्दा दिव्यांगाना न्याय मिळावा म्हणून प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किसन खुर्दामोजे, ञिबंक मुध्दळ,सूनिता यंदे, छाया भुताडे, शिवाजी लढे, रफतबाई शेख,मारोती कदम,किरण चव्हाण, वैंजयता कांबळे, मारोती चव्हाण ईत्यादी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते

148 Views
बातमी शेअर करा