किनवट: दिनांक 29-8- 2021 रोजी गस्त करीत असतांना गोकुंदा ते किनवट रोडवर आटो मध्ये हळद बेरा(गैरी) लाकडे आढळून आली त्यामुळे आटोचा पाठलाग करीत असताना ऑटो मधील दोन नग फेकून ऑटो सह आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.
कारवाईमध्ये नवनियुक्त सहाय्यक वन संरक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली फिरते पथक चे वनक्षेत्रपाल योगेश शेरेकर, वनक्षेत्रपाल पी एल राठोड, रोहित जाधव वनक्षेत्रपाल माहूर खरबी वन्यजीव वनक्षेत्रपाल नितीन आटपाडकर यांच्या समक्ष या कारवाईत वनपाल जी टी माझळकर, एस एम यादव, रवी दांडेगावकर वनरक्षक बालाजी झंपलवाड अनिल फोले वनमजूर पठाण, फिरते पथक वाहन चालक बाळकृष्ण आवले यांचा या कारवाईत सहभाग होता जप्त केलेल्या मालाचा तपशील खालील प्रमाणे
जप्त नग दोन घनमीटर.0.176 माल किंमत 4369 इतकी आहे.
एका आटोचा एवढे कर्तव्यदक्ष अधिकारी कर्मचारी पाठलाग करून ही तस्कर सापडले नाहीत!हे विशेष.
पाठलाग करीत असलेल्या ऑटो मधील हळद बेरा लाकडाचे 2नग फेकून कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांसमोरून ऑटो सह आरोपी पळून जाण्यात यशस्वी.
206 Views