KINWATTODAYSNEWS

कराड सरांच्या संकल्पनेतील मिशन नीट उद्दिष्ट पुर्तीसाठी वाटचाल

किनवट शहर प्रतिनिधी (राज माहुरकर)

गोकुंदा येथील आश्रम शाळे मध्ये आदिवासी मुला मुली साठी मुख्याध्यापक कराड एन के सरांची संकल्पना व प्रयत्नातून मिशन नीट 2021 अंतर्गत 61 आदिवासी मुला मुलींना वैद्यकीय शिक्षण पूर्वतयारीसाठी 14 तास अभ्यास करण्यासाठी विशेष सुविधा सह संधी उपलब्ध करून देण्यात आली.

किनवट सारख्या डोंगराळ भागात आदिवासी मुला-मुलींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मिशन नीट अंतर्गत कराड एन के मुख्याध्यापक यांनी प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट यांच्यासोबत चर्चा करून आदिवासी समाजातील अतिशय गरीब व होतकरू मुला-मुलींना वैद्यकीय शिक्षण पूर्वतयारीसाठी कराड सर यांच्या संकल्पनेतून व प्रयत्नातून 61 आदिवासी मुला मुली कडून दररोज 14 तास अभ्यास करून घेऊन अतिशय परिश्रम घेत आहेत या उपक्रमामुळे नांदेड जिल्ह्यात कराड सरांचे सर्वत्र कौतुक होत असून हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुला-मुलींना राहण्याची व जेवण्याची व्यवस्था महिला प्रतिनिधी रजनी उके तर मुला-मुलींच्या आरोग्याची व्यवस्था एस आर पुरी सर यांच्याकडे असून मुला मुलीला शिक्षण देण्यासाठी डी एस घुले , विवेक कांबळे, गोविंद जाधव, नितीन जाधव, भिंगेवार सर व संगणकीय सुविधा उपलब्ध करून योग्य मार्गदर्शन करणारे माधव कांबळे सर हे अभ्यासपूर्ण शिक्षण देत असून यावर एन के कराड सर कॅप्टन ची भूमिका निभावत असल्याने मिशन नीट यशस्वीरित्या संपन्न होताना दिसत आहे यावेळी शाळेला दैनिक साहित्यसम्राट चे शहर प्रतिनिधी व गूगल ऑनलाईन ऍप्लिकेशन सेंटर चे संचालक राज माहुरकर यांनी भेट दिली असता त्या वेळेस त्यांचे सोबत सुरेश घुमडवार, विजय वाघमारे व शाळेतील कर्मचारी उपस्थित होते.

230 Views
बातमी शेअर करा