मुंबई : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघाच्या वतीने मुंबईमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त दि १ व २ मे २०२१ असे दोन दिवस जीवाची पर्वा न करता कोविड काळात सेवा देणाऱ्या ५५० मुंबई पोलीस बांधवांना नाश्ता व पाणीबाॅटल वाटप करण्यात आले. संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर यांच्या प्रयत्नाने कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता पूर्ण वेळ कर्तव्य बजावत असणा-या पोलीसांना प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाने नाश्ता व पाण्याची व्यवस्था केल्याने सर्व पोलीसांनी संघाचे आभार मानले. यावेळी राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर, क्राईम राज्य प्रमुख नफीस शेख, ठाणे जिल्हा महिला युवाध्यक्षा ज्योती अहिरे, सांताक्रुझ विभागाध्यक्ष संतोष येरम, संघाचे पदाधिकारी पत्रकार हेमंत कांबळे, मायकल फर्नांडिस, नितीन सागवेकर, संजय सुर्वे आदी पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. मुंबईतील सांताक्रूझ हायवे, वाकोला पोलीस ठाणे, पार्ले पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस, कालिना मिलेट्री कॅम्प, मुलुंड चेक नाका, ठाणे चेक नाका, वाहतूक पोलीस, गस्त घालणाऱ्या पोलीस बांधवांना व आर टी ओ नाश्ता व पाणी वाटप करण्यात आले.
दिवाळी आली पोलीस, दसरा आला पोलीस, होळी आली पोलीस,ईद आली पोलीस, नेते येणार पोलीस, पी एम पासून तर सदस्यांपर्यंत बंदोबस्त पोलीस, पूर आला पोलीस, कोविड आला पोलीस, मोर्चा आला पोलीस, आंदोलन झालं पोलीस,अपघात झाला पोलीस, आग लागली पोलीस, सोनं चोरी पोलीस, गाडी चोरी पोलीस, पैसे चोरी पोलीस अशा विविध ठिकाणी जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणा-या पोलीस बांधवांना प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने नास्ता व पाणी देण्याची संधी मिळाली या उत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी व पत्रकारांनी मुंबई पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने मुंबईत ५५० पोलीसांना नाश्ता व पाणी वाटप
163 Views