नांदेड: अखिल भारतीय किसान सभा, लाल बावट्याच्या वतिने आज भारतीय स्टेट बँक मुख्य ब्रांच नांदेड प्रमुख व्यवस्थापक मा.पठारे साहेबांना किनवट तालुक्यातील हजारो प्रलंबीत कर्ज प्रकरणे निकाली काढण्या संदर्भात आज नांदेड येथे मुख्य ब्रांच तेथे निवेदण देण्यात आले.
किनवट तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांची कर्ज प्रकरणे तालुक्यातील अनेक स्टेट बॅक शाखांन मध्ये प्रलबिंत आहेत.
अनेक शेतकऱ्यांना कर्ज प्रकरणे दाखल करून चार/पाच महिने झाली परंतु अद्याप हि बॅक प्रशासना कडून अनेक तांञीक अडचणी दाखवल्या जात आहेत.तातडीने सर्व पिक कर्ज प्रकरणे निकाली काढण्यासंदर्भात,तांञीक अडचणी दुर करण्यासंबंधी मा.विभागीय प्रमुख पठारेनी यावेळी सांगीतले.
तातडीने कर्ज प्रकरणे निकाली न काढल्यास , वेग वेगळ्या बॅक शाखावर धडक आंदोलन नेऊ असे किसान सभेचे नेते काॅ.अर्जुन आडे यांनी सांगितले.यावेळी अप्पारापेठ गावचे युवा सरपंच काॅ.यल्लया कोतलगाम,काॅ.राम कंडेल, कुवरसिंह राठोड, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
तातडीने कर्ज प्रकरणे निकाली न काढल्यास , वेग वेगळ्या बॅक शाखावर धडक आंदोलन नेऊ – किसान सभेचे नेते काॅ.अर्जुन आडे
133 Views