नांदेड: मौजे बोरगाव जिल्हा सोलापूर येथील मातंग समाजाचे धनाजी साठे यांचा दि.20.आगस्ट रोजी मृत्यू झाला असता गावातील सार्वजनिक समशानभूमीत अंत्यविधी करण्यासाठी मयत धनाजी साठे यांचे प्रेत घेऊन साठे कुटूंबीय आणि त्यांचे नातेवाईक जात असताना गावातील काही धर्माध आणि जातीयवादी लोक यांनी जातीयद्वेषभवणेतून मयत धनाजी साठे यांचा मृतदेह रोखले आणि साठे कुटुंबिय व त्यांच्या नातेवाईकांना सार्वजनिक समशानभूमीत जाण्यास मज्जाव केला असता साठे कुटूंबियानी पोलिसात कळविले असता पोलीस गावात येऊन धर्माध व जातीयवादी लोकांना न रोखता उलट मयत धनाजी साठे आणि त्यांचे नातेवाईक यांना सार्वजनिक समशानभूमीत जाण्यास पोलीस गाडी समोर लाउन अडवणूक सुरू केली.गावातील धर्माध आणि जातीयवादी गावगुंड व आणि पोलीस यांचा निषेध नोंदवत साठे कुटूंबीय व सामाजिक कार्यकर्ते यांनी मयत धनाजी साठे यांचा अंत्यविधी बोरगाव ग्रामपंचायत कार्यल्यासमोर केला.ही घटना संबंध महाराष्ट्रसह देशाला काळिमा फासणारी आहे. या धर्माध जातीयवादि घटनेच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पार्टी( युनायटेड)) व समविचारी पक्ष संघटनांच्या वतीने पार्टीचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी कॉम्रेड प्रा.सदाशिव भुयारे बळेगावकर यांच्या नेत्रत्वाखाली दि.24 आगस्ट 2021 रोजी सकाळी 11:30 वाजता नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रचंड निषेध निदर्शने करण्यात आली.
आंदोलकांनी निषेधाच्या जोरदार घोषणा देऊन जिल्हाधिकारी परिसर दणाणून सोडला होता.आंदोलकांनी महाराष्ट्रराज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे साहेब यांच्याकडे सदरील प्रकरणात विशेष लक्ष घालून आरोपीला कठोर शिक्षा करण्यासाठी सदरील प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून तज्ञ वकिलाची नेमणूक करावी,साठे कुटूंबियाना पोलीस संरक्षण देण्यात यावे,पीडित साठे कुटूंबियाचे शहरात पुनवर्षण करण्यात यावे.गाव आणि शहरातील सार्वजनिक समशानभूमीत धर्म,जात,लिंग ,वंश असा भेदभाव करणाऱ्यावर कठोर शिक्षा करावी,2021 च्या जनगणनेमध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, जैन, पारशी, बौद्ध, धर्मव्यतिरिक्त निधर्मी नागरिकांसाठी स्वतंत्र नोंदणी तक्ता उपलब्ध करून द्यावा.
आंदोलनास लहुजी शक्ती सेना,अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलन,भारतीय लहुजी सेना, आदींनी पाठींबा दर्शविला होता.आंदोलन यशस्वी करण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पार्टी युनायटेडचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी कॉ.प्रा.सदाशिव भुयारे, महाराष्ट्रप्रदेश उपाद्यक्ष कॉ.प्रा.इरवंत रा.सुर्यकर,,मराठवाडा प्रवक्ता कॉ.संतोष शिंदे,नांदेड जिल्हादयक्ष कॉम्रेड अंबादास भंडारे,नांदेड शहारादयक्ष कॉ.मंगेश चांदू देवकाबळे, नांदेड,जिल्हा महासचिव कॉ.प्रा.देविदास इंगळे,भारतीय शिक्षक प्राध्यापक संघटन चे नांदेड जिल्हाध्यक्ष कॉ.प्रा.राज सुर्यवंशी,नांदेड शहरप्रसिद्धीप्रमुख कॉ.नितीन गादेकर, नांदेड जिल्हा प्रवक्ता कॉ.सुप्रिया वाघमारे, भारतीय स्टुडंट्स फेडरेशनचे मराठवाडा संघटक कॉ.कैलास गायकवाड,कॉ.माहेश्वरी गायकवाड तादलापूर, साधना गायकवाड,अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलनाचे संस्थापक आद्यक्ष सतीश कावडे, राज्य उपाद्यक्ष परमेश्वर बंडेवार,लहुजी शक्ती सेनेचे विभागीय उपाद्यक्ष,प्रीतम गवाले, सामाजिक कार्यकर्ते संजय गवलवाड सुडगीकर,बालाजी गवलवाड चैनपूरकर,पत्रकार पिराजी गाडेकर, पत्रकार जनक गायकवाड,उत्तम गायकवाड, पत्रकार विनायक कामठेकर,भारतीय लहुजी सेनेचे नांदेड जिल्हादयक्ष गोपाळ वाघमारे, लहुजी शक्ती सेनेचे मारोती वाघमारे आदींनी सक्रिय सहभाग नोंदविला