मालवाडी बोरगाव येथील जातीवादी गावा गुंडानी अंत्य याञा अडवून अंत्य विधी करू दिला नाही.
गाव गुंडांवर अॕट्रासिटी अॕक्ट प्रमाणे , मोक्का दाखल करून अटक करण्यात यावी. पोलिसांनी अंत्य विधी ला विरोध केल्या मुळे पोलीस निरिक्षकाला निलंबित करण्यात यावे,अशी मागणी लहू सेने केली.
नागपूर ः लहू सेने चे संस्थापक-प्रमुख संजय कठाळे यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्ट मंडळ जिल्हाधिकारी मा.आर विमला राव यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा,ना. उध्दवजी ठाकरे साहेब यांना निवेदन देण्यात आले.
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालूक्यात माळवाडी बोरगार या गावातील गाव गुंडांवर अॕट्रासिटी अॕक्ट प्रमाणे मोक्का दाखल करून अटक करण्यावे. गावात मातंग समाजाचे सरपंच दशरथ साठे यांच्या भावाची मयत दि.20/08/2021 शुक्रवार रोजी रात्री 2.00 वाजता झाली.
परंतु गावातील जुन्या वादातील काही वादग्रस्त जातीवादी गुंड प्रवृत्तीच्या समाजकंटकांनी मयताला व सरण घेऊन निघालेल्या त्यांच्या टेम्पो आडवून रस्त्या मध्ये पाणी सोडून अंत्यविधी स्मशान भूमीत करू दिला नाही.
याअंत्यविधीला पोलिसांनी सुध्दा विरोध केला , येथील पोलीस निरिक्षकाला ताबडतोब निलंबित करा.
साठे कुंटूबियांनी ग्रामपंचायतच्या समोरच अंत्यविधी करावा लागला . पण जातीवादयांनी प्रेतची हेडसाळ व विटंबना करून मानूसकीला काळीमा फासणारी घटना आहे.
या घटनेचा तिव्र शब्दांत लहू सेना निषेध करते.
सर्वश्री..लहू सेने चे प्रमुख संजय कठाळे ,युवा नेते पवन मोरे , दिलीप वानखेडे,नागपूर: अशोक खडसे,जावेद पठाण , सुरेश कावळे , रुपराव सनेश्वर , अॕड.राजेश शिवनकर , जितेंन्द गायकवाड , सुनिल गंगावने , विनोद वैराळकर , अजाबराव खडसे, विक्की ओगले , सौ. आरती गंगावने , पार्वती खडसे , जय नवरखेले , सुशिल शेलारे ईत्यादि उपस्थित होते.