KINWATTODAYSNEWS

संघपाल सुरेश शेंडे (वय 18) वर्षे रा. समतानगर,किनवट यांचे डेंगू आजारामुळे निधन

किनवट:      किनवटवासीयांसाठी अत्यंत दु:खदायक बातमी घडली असून समतानगर येथील संघपाल सुरेश शेंडे (वय 18) वर्षे यांचा डेंगू आजारामुळे अल्पावधीतच त्यांचा औरंगाबाद येथे दि.22 ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

संघपाल हा अत्यंत मनमिळाऊ व हुशार मुलगा होता.तो सुरेश विठ्ठल शेंडे यांचे द्वितीय पूत्र होते .स्मृ.विठ्ठल शेंडे [सायफळ ] यांचे ते नातू होते. 23/08/2021रोजीवेळ दुपारी 4 वाजता त्यांचा अंत्यविधीचा किनवट येथे करण्यात आला.
    अल्प वयात डेंगु या आजाराने दु:खद निधनामुळे किनवट परिसरात शोककळा पसरली आहे.ईश्वर त्यांचा कुटुंबियाना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो.
          अनेक वेळा स्थानिक पत्रकारांनी वेळोवेळी न.पा.प्रशासनाला बातम्याद्वारे डेंग्यू आजार किनवट शहरात फोफावत असल्या बद्दल जागे करण्याचा प्रयत्न केला. परंतु याची दखल घेतली जात नाही ही शोकांतिका आहे.

912 Views
बातमी शेअर करा