नांदेड जिल्हा प्रतिनिधी दि २३/८/२१:- सरकारी नौकर्यांमध्ये दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या चार टक्के आरक्षणाचा कोटा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे आणि या संदर्भातील राजपत्रीत अधिसूचना हि नुकतीच जारी केली असुन यानुसार आता दिव्यांगांना आयपीएस, पोलिस दल, रेल्वे संरक्षण दल यासारख्या सरकारी सेवांमधील नियुक्त्यामध्ये चार टक्के मिळणारे आरक्षण रद्द करण्यात आले आहे आणि हा जाचक जुलमी निर्णय महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील दिव्यांगांवर घोर अन्याय करणारा आहे आणि भविष्यात या निर्णयाप्रमाणेच महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील सर्व घटक राज्ये हि असेच निर्णय घेऊन दिव्यांगांना हक्काच्या चार टक्के आरक्षणापासुन दुर ठेऊ शकतात आणि भविष्यात दिव्यांगांना शासकीय नौकरी असो वा निमशासकीय नौकरी असो ती मिळणारच नाही त्यामुळे असा प्रकार भविष्यात घडु नये यासाठीच आज दि 23 आॅगस्ट 2021 रोजी कमल फाउंडेशन संचलित बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीती नांदेड आणि संभाजी ब्रिगेड दिव्यांग आघाडी नांदेड यांच्याकडुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राहुल साळवे यांच्या नेतृत्वात राजपत्रित अधिसुचना पत्राचे दहन करण्यात आले तसेच संभाजी ब्रिगेड दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रदिप पाटिल गुबरे आणि नागनाथ कामजळगे यांनी केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय परीसर दनानुन सोडला त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन सादर केले आणि या निवेदनात म्हटले आहे कि.सदरील हा जुलमी जाचक निर्णय मागे घेत तत्काळ रद्द करावा अन्यथा लवकरच पंतप्रधान कार्यालय नवी दिल्ली येथे कुठलीच पुर्व सुचना न देता तिवृ स्वरूपाचे आंदोलन करू जर तीथे हि न्याय न मिळाल्यास नांदेड जिल्ह्यात एकाही केंद्रीय मंत्र्यांला तसेच केंद्रिय पदाधिकारी आणि पथकाला फिरकु देणार नाही तथा सभा,बैठका होऊ देणार नाही असा कठोर इशारा आंदोलन कर्त्या सर्व बेरोजगार दिव्यांगांनी घेतला आहे या आक्रमक आंदोलनात राहुल साळवेसह सुनिल जाधव,प्रदिप पाटील गुबरे, नागनाथ कामजळगे, शामसुंदर गायकवाड, लक्ष्मीकांत जाधव, परमेश्वर आकाडे.संजय सोनुले.विठ्ठल सुर्यवंशी.राजु ईराबत्तीन.ज्ञानेश्वर बेळे.वैभव पईतवार,किरणकुमार न्यालापल्ली.सिद्धोधन गजभारे.शेख आरिफ.संदिप घुगे,शेख मौलाना यासिबसाब.गजानन हंबर्डे.मंगेश जाधव.सयद माजीद अली.शेख गौस.शंकर गिमेकर.दिलीप कांबळे.संजय बोईनवाड.माधव बेरजे.गणेश वर्षेवार.निलेश गोनेवार.रमेश लंकाढाई.प्रकाश नागोरे.अब्दुल हबीब अब्दुल हतीफ.अब्दुलवाह अब्दुल खादर.ईस्माईल चौधरी.प्रकाश निलावार.सय्यद हाकिम सय्यद करीम.शेख जाकेर शेख रसुल.कमलबाई आकाडे,रिजवाणा बेगम यांच्यासह शेकडो दिव्यांग सहभागी झाले होते.
बेरोजगार दिव्यांगांनी केंद्र सरकारच्या विरोधात नारेबाजी देत राजपत्रित अधिसुचना पत्राचे दहन करून केले पंतप्रधानांना निवेदन सादर.
140 Views