KINWATTODAYSNEWS

दत्तात्रय मामा भरणे राज्यमंत्री तथा पालकमंत्री सोलापूर यांना मौजे माळेवाडी येथील घटनेतील सर्व आरोपींवर कारवाई करण्यात यावी यासाठी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने निवेदन

सोलापूर: आज दिनांक 22/8/2021 रोजी माननीय दत्तात्रय(मामा)भरणे राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सोलापूर जिल्हा यांना मौजे माळेवाडी बोरगाव ता. माळशिरस जि. सोलापूर येथील घटनेतील जातीयवादी गावातील गावगुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कार्यवाही करून त्वरित अटक करण्यात यावी यासह इतर मागण्यांचे निवेदन लहुजी शक्ती सेना इंदापूर तालुका यांच्या वतीने देण्यात आले.यावेळी लहुजी शक्ती सेना इंदापूर तालुका अध्यक्ष मा.दत्ताभाऊ जगताप ,ता.युवक अध्यक्ष मा.अजय भाऊ सोनवणे ,ता.कोर कमिटी अध्यक्ष मा.तानाजी भाऊ सोनवणे पुणे जिल्हा कोर कमिटी संघटक मा.संतोष भाऊ गायकवाड इंदापूर तालुका युवक कार्याध्यक्ष मा.अक्षय भाऊ बागाव,ता.को.क. संघटक मा.अनिल भाऊ तुपे ,युवा नेते मा.दयानंद भाऊ पाटोळे ,ता.को.कमिटी उपाध्यक्ष अंकुश भाऊ जोगदंड, ता युवक उपाध्यक्ष मा.सागर भाऊ गायकवाड, कोर कमिटी कार्याध्यक्ष आनंद भाऊ गायकवाड सामाजिक कार्यकर्ते मा.दादासाहेब जगताप, शहराध्यक्ष सचिन भाऊ मोरे,सामाजिक कार्यकर्ते दिलीप ढगे ,मानकरवाडी शाखाध्यक्ष मा.प्रदीप भाऊ तुपे यांच्यासह लहुजी शक्ती सेना इंदापूर तालुका प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

179 Views
बातमी शेअर करा