मुंबई : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ,महाराष्ट्र राज्य या संघाच्या वतीने मुंबईमध्ये नुकताच जनतेच्या सुरक्षिततेसाठी कर्तव्यावर असलेल्या पोलीस बांधवांना राखी बांधून अनोखा रक्षाबंधन साजरा करण्यात आला. संघांचे संस्थापक अध्यक्ष डी.टी. आंबेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
या विशेष उपक्रमासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघांचे राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर, मुंबई अध्यक्ष संतोष येरम, मुंबई महिला अध्यक्षा अंजली देवा, सचिव नियती सावंत, संजय सुर्वे, अमेझिंग ग्रुपच्या महिला आदि पदाधिकाऱ्यांनी विशेष परीश्रम घेतले. पोलीस बंधू-भगिनी आपल्या जीवाची पर्वा न करता २४ तास आपल्या सेवेत तत्पर असतात व आपली रक्षा करतात त्यामुळे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या माध्यमातून मुंबई महिला पदाधिकाऱ्यांनी सांताक्रुज पूर्व पोलीस ठाणे व निर्मल नगर खार पोलीस ठाणे येथील पोलीस बंधू -भगिनींना रक्षाबंधनानिमित्त राखी बांधून तुम्हीच आमचे रक्षक आहात हा संदेश दिला.
वाकोला पोलीस ठाणेच्या वरिष्ठ पोलीस अधिकारी सुनैना नटे यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या उल्लेखनीय रक्षाबंधन उपक्रमाचे कौतुक करून संघाचे आभार मानले.
दिवाळी आली पोलीस, ईद आली पोलीस, अपघात झाला पोलीस, चोरी झाली पोलीस, मंत्री आले पोलीस, नेते आले पोलीस, मारामारी झाली पोलीस अशा ठिकाणी पोलीस जनतेच्या सुरक्षिततेसाठी कर्तव्यावर असतात, जनतेची सेवा व सुरक्षा करणाऱ्या पोलीस बंधू -भगिनींना प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचा सलाम! पोलिसांना राखी बांधून हा स्तुत्य उपक्रम साजरा केल्याबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या मुंबई टीमचे सर्व पदाधिकारी व पत्रकारांनी अभिनंदन केले आहे.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाने पोलिसांना बांधली राखी ;पोलिसांकडून विशेष उपक्रमाचे कौतुक
77 Views