दिनांक:-21-08-2021 रोजी मौ. देवठाना येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त देवठाणा येथील नव युवकांनी लोकस्वराज्य आंदोलन या संघटनेचे महाराष्ट्र पातळीवरील काम लक्षात घेऊन या संघटनेत काम करण्याचा निर्धार केला आहे माननीय रामचंद्र भरांडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या चळवळीत काम करण्यास इच्छा व्यक्त केली यावेळी गावातील सर्व समाज बांधव महिला यांनी त्या सर्व नव युवकांना शुभेच्छा दिल्या व प्राध्यापक रामचंद्र भरांडे सरांनी नव युवकांना मार्गदर्शन केले व अनु.जाती आरक्षणाची अ.ब.क.ड कशी लढता येईल यावर सविस्तर असे मार्गदर्शन केले यावेळेस या कार्यक्रमास उपस्थित मा.संतोषजी तेलंग (मराठवाडा विद्यार्थी आघाडी अध्यक्ष), मा.बाळासाहेब टिकेकर (जिल्हा कोअर कमिटी अध्यक्ष), मा.माणिक कांबळे (जिल्हा अध्यक्ष नांदेड उत्तर), मा.अंकुश दादा गायकवाड (युवक जिल्हाध्यक्ष),मा.पि. जि. केदारे (तालुकाध्यक्ष मुदखेड),मा.मुकेश गायकवाड(जिल्हाउपाध्यक्ष नांदेड),मा.साईप्रसाद जळपतराव(तालुकाध्यक्ष भोकर),मा.शिवराज केदारे(सोशल मीडिया जिल्हा संघटक),मा.नागेश गायकवाड(सचिव भोकर),उपस्थित होते व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे मा.प्रा.रामचंद्र भरांडे सर यांच्या हस्ते नियुक्ती प्रमाणपत्र देण्यात आले अंकुश टिळेकर (शाखा अध्यक्ष देवठाना),लक्ष्मण भालेराव(उपाध्यक्ष),उध्दव डकोरे(सचिव),प्रशांत गायकवाड(सहसचिव),रविकिरण उडगीरे(कोषाध्यक्ष),प्रदीप उदगीरे(संघटक),आदी व देवठाना येथील सर्व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सूत्रसंचालन मारोती शेळके यांनी केले व आभार अंकुश टिळेकर यांनी मानले
लोकस्वराज आंदोलन या सामाजिक संघटनेच्या नामफलकाचे अनावरण
201 Views