KINWATTODAYSNEWS

अण्णाभाऊ साठे जयंती निमित्य महाकवी वामनदादा कर्डक संगीत पुरस्कार व डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार 25 रोजी आदिलाबाद येथे आंबेडकरी कला महोत्सवात प्रदान

किनवट : येथून जवळच असलेल्या सीमावर्ती आदिलाबाद येथील अण्णाभाऊ साठे मैदान, पंचशील बुद्ध विहार, केआरके कॉलनी येथे दि. 25 ऑगष्ट रोजी सकाळी 11 वाजता अ.भा. आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळ, महार बटालियन आदिलाबाद टाउन आणि अण्णाभाऊ साठे मेमोरियल असोसिएशन, केआरके कॉलनी यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षावास, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 101 व्या व महाकवी वामनदादा कर्डक यांच्या 99 व्या जयंतीनिमित्त आंबेडकरी कला महोत्सव, महाकवी वामनदादा कर्डक संगीत पुरस्कार आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित केला आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार जोगू रामन्ना, अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक मधू बावलकर, प्रमुख अतिथी जिल्हा परिषद चेअरमन जनार्धन राठोड, आमदार बापूराव राठोड ( बोथ ), नगराध्यक्ष जोगू प्रेमेन्दर, स्वागताध्यक्ष प्रशांत वंजारे (अ.भा. आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळ ) असतील. उत्तम कानिंदे सूत्रसंचालन करतील.

प्रमुख पाहुणे म्हणून महार बटालिएन बेलाचे तेजराव मस्के, डॉ. बी. आर. आंबेडकर मेमोरियल असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब कांबळे, कुमार सोनकांबळे, प्रा. प्रज्ञाकुमार रत्नझाडे. गौतम ठमके (खोगदूर), ऍड. अजय जोंधळे (गुडेहातनूर), परमेश्वर (एमपीटीसी नारनूर), नगरसेविका अंजुताई साहेबराव पाईकराव, संविधान वाचवा देश वाचवाचे राष्ट्रीय अध्यक्ष दयानंद गायकवाड, संजय दहिकांबळे (गुडेहातनुर), माधव मस्के, सिद्धार्थ ससाणे, गोविंद बुधे, महेंद्र दुर्गे (नारनूर), परमेश्वर नरवाडे, लक्ष्मीकांत कांबळे, जितेंद्र जाभाडे, दयानंद कांबळे, शिवाजी कांबळे, आनंद पाईकराव, कांतराव दुर्गे (नारनूर), नागोराव पाईकराव, अनिल साळवे (समता फाऊंडेशन आदिलाबाद), सुरेंद्र लांडगे उपस्थित राहतील.

यावेळी रमेश जीवने (यवतमाळ ), प्रा.डॉ. सोनबा साळवे ( हैदराबाद), अवधेशकुमार नंद (गोंडा ), दयासागर बौद्ध (उ.प्र.) डॉ. सुशीलकुमार कोहाड ( बैतुल), डॉ. भारतभुषण ( हैद्राबाद), डॉ. भगवान कदम (पुणे), प्रा. डॉ.हमराज ऊईके (बीड), डॉ. सुरेश शेळके (परभणी), सम्राट व्यंकटस्वामी माचाला ( हैदराबाद ), अनुरत्न वाघमारे (नांदेड ), प्रा. अशोक दवणे, प्रा. डॉ. पंजाब शेरे (किनवट), आचार्य सुर्यकांत भगत (वर्धा), अशोक ढोले (नांदेड), मोक्षवीर भोवरे (हैद्राबाद), दादाराव कयापाक (किनवट), प्रा. डॉ. आनंद भालेराव (किनवट), अशोक माहोलकर, तिरुपती दुर्ग (असिफादाबाद), चरणदास उपरे (एच.एम.), तुकाराम जीवने, सोमन्नाजी घुले, डॉ. सुरेश दुर्गे, विश्वंभर दुर्गे , वासुदेव शेंद्रे (पांढरकवडा) यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.या कार्यक्रमास बहुसंख्येनं उपस्थित रहावे.
असे आवाहन संयोजक म्हणून अण्णाभाऊ साठे मेमोरियल असोसिएशन के.आर.के. कॉलनी, माता रमाबाई आंबेडकर महिला मंडळ, गुलशन बनसोडे (महार बटालियन ), संतोष लांबटिळे (माजी एमपीटीसी), बालाजी माने, रवि गवाळे (अध्यक्ष अण्णाभाऊ साठे मेमोरियल असोसिएशन, केआरके कॉलनी), नामदेव काकडे (अध्यक्ष ), व दत्तात्री सूर्यवंशी (जनरल सेक्रेटरी, संविधान बचाव देश बचाव) यांनी केले आहे .

116 Views
बातमी शेअर करा