KINWATTODAYSNEWS

उदगीर येथे उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या लक्ष्मीबाई सिद्राम मोरे रा. रामपूर तांडा (गुत्ती )यांची भेट घेतली आणि मन हेलावून गेलं…

मातंग जातीवर होत असलेला अन्याय दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात मातंग जातीवर रोज एक नवीन प्रकरण समोर येत आहे. ही अन्यायाची मालिका थांबवावी कशी ? आणि कुठे हा फार मोठा प्रश्न आज समाजा समोर उभा राहिला आहे.
काल उदगीर येथे उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या लक्ष्मीबाई सिद्राम मोरे रा. रामपूर तांडा (गुत्ती )यांची भेट घेतली आणि मन हेलावून गेलं…
लक्ष्मीबाई सांगत होत्या मुलीचं लग्न करायचं म्हणून एक लाख रुपये उसतोडीची उचल घेतली. आणि दि. 10/6/2021रोजी माझे पती सिद्राम निवृत्ती मोरे यांना घरातून तलावात मासे पकडण्यासाठी तीन जण येऊन घेऊन गेले. आणि माझे पती घरी आलेच नाहीत मी जे पतीला बोलवायला आले होते त्यांच्या घरी जाऊन विचारणा केली तर त्यांनीच मला पुन्हा विचारलं तर बघ असे म्हणून धमकावले. आणि त्यामुळे मी घरी आले आणि थोड्या वेळाने तुझा नवरा तळ्यात मरून पडला आहे .असे बोलावून नेणाऱ्यांच्या एका नातेवाईकाने सांगितले. मी पोलीस स्टेशनला गेले तर मला व माझ्या मुलाला पोलीस स्टेशनला बसवून ठेवलं आणि माझ्या पतीला मला न दाखवताच पोस्ट मार्टम करण्यासाठी नेले व पोलिसांनी आमच्या सह्या घेऊन मृतदेह ताब्यात दिला. माझ्या पतीच्या अंत्यविधीला आलेल्या नातेवाईकांवर आरोपीच्या नातेवाईकांनी दगडफेक केली आणि पोलीस मात्र बघत होते. माझ्याच नातेवाईकांना जखमी केले तरीही पोलिसांनी तक्रार घेतली नाही. माझा पतीचा मृत्यू संशयास्पद रीतीने झाला आहे. कारण पोलिसात जाऊ नको तर दीड लाखात मिटवून घे. असे संशयितांच्या नातेवाईकांनी मला प्रलोभन दिले. त्यामुळे माझा संशय अजून बळावला आहे. आणि म्हणून ज्या लोकांनी माझ्या पतीला बोलावून नेले त्यांचेवर कारवाई करावी. कारण माझ्या पतीच्या गुडघ्यावर जखमा होत्या. म्हणून पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेले असता, पोलिसांनी माझी तक्रार घेतलीच नाही. उलट माझ्यावर आणि माझ्या नातेवाईकांवर आरोप केले. आज समाजात माझं जगणं मुश्किल झाले आहे. मला जर न्याय मिळाला नाही तर, मी सुद्धा माझे जीवन संपवेल. असे सांगून लक्ष्मीबाई रडत होत्या. तर आम्ही समाजाचा माणूस म्हणून माजी आमदार सुधाकर भालेराव साहेबांकडे गेलो तर भालेराव साहेबांनी मात्र तुमच्याकडून काहीच होणार नाही. जा आणि खुरपून खा. लेकरंबाळ जगवा. तुम्हाला न्याय मिळू शकत नाही. असं म्हणून आम्हाला हाकलून लावलं. आता मला न्याय कोण देईल असा टाहो ती माऊली फोडत होती.
या प्रकरणी पोलीस स्टेशनला फोन केला असता सोंडारे साहेब म्हणत होते मॅडम या प्रकरणात काहीच तथ्य नाही. ती बाई विनाकारण उपोषणाला बसली आहे. त्यांनी जे बोललं ते रेकॉर्ड केलं.आज लक्ष्मीबाई पडत्या पावसामध्ये उपविभागीय कार्यालयासमोर रात्रीच्या किर्र अंधारात केवळ साधा तंबू टाकून उपोषणास बसली आहे रात्रीला अंधारात साप विंचू किडा काही चावून गेले अथवा अंधारात कोणी जीव घेतला याला जबाबदार कोण राहणार? लक्ष्मीबाई आणि तिच्यासारख्या पीडित असंख्य लोक या समाजात आहेत. त्यांचं जगणं म्हणजे जगणं नाही का? पोलीस स्टेशन आमचं नाही.. नेता आमचा नाही मग आम्हाला न्याय कोण मिळवून देणार? आज लहुजी क्रांती मोर्चा लक्ष्मीबाईची न्यायालयीन लढाई लढण्यासाठी मैदानात आहे.

नंदाताई लोखंडे
महाराष्ट्र राज्य
संयोजिका लहुजी क्रांती मोर्चा
मो.नं. 8308640914

269 Views
बातमी शेअर करा