सगरोळी प्रतिनिधी : गणेश गिरगावकर : बिलोली तालुक्यातील बोळेगाव येथील येथील रहिवासी असलेले दैनिक लोकमत वृत्तपत्राचे सगरोळी प्रतिनिधी कै बस्वराज परमेश्वर वाघमारे वय 51 वर्ष यांचे नुकतेच 19 आँगस्ट 2021 रोजी सकाळी 10:00 ते 11:00 दरम्यान हद्दविकाराच्या तीव्र झटक्याने अतिशय दु:खद निधन झाले. आपल्या आयुष्यात लेखनीच्या माध्यमातून पंधरा ते वीस वर्षांपासून शेतकरी, निराधार, श्रावण बाळ योजना,अपंग, वंचीत घटकातील लाभार्थी, शेतकऱ्यांच्या समस्या, बेरोजगारांच्या समस्या, तसेच तळगाळातील समस्या आपल्या लेखणीच्या माध्यमातून शासणाच्या निदर्शनास आणून प्रश्नाना वाचा फोडून न्याय मिळून देण्याचे कार्य त्यांच्या हातून घडले त्यांच्या दुरर्दैवी निधनाने त्यांच्या कुंटुबासह सगरोळीसह सगरोळी भागात हळहळ व्यक्त होत आहे. शासकीय योजनेच्या माहितीसह राजकारणातील नेत्यांचे प्रसिद्धी करून त्यांना निवडून आणेपर्यत आपल्या लेखणीतून वृत्तमानपत्राच्या माध्यमातून प्रसिद्धी करून जनतेसमोर आणून देत राजकीय क्षेत्रात त्यांना आपले नाव कोरले बोळेगाव येथील मूलनिवासी असलेले दैनिक लोकमतचे सगरोळी प्रतिनिधी अभ्यासू जानकार,अनुभवी पत्रकार म्हणून विविध पारितोषिकाने त्यांचा सन्मान करण्यात आले. अनुभवी पत्रकार बस्वराज परमेश्वर वाघमारे यांचा हद्दविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने पत्रकारितेतील एक हिरा हरपल्याची खंत पत्रकार संघासह बिलोली तालुक्यात होत आहे. समाजाला आपल्या लेखणीच्या माध्यमातून न्याय मिळून देणाऱ्या बस्वराज वाघमारे यांच्या कुंटुबावर दु:खाचा डोंगर ओढावले त्यांच्या कुंटुबात आई,पत्नी, दोन मुले,एक मुलगी आहेत मुले शिक्षणासाठी पुणे येथे असल्याने मुलांचे समोरील शिक्षण होईल तर कसे असा भविष्यातील शिक्षणाचा प्रश्न पाल्यासमोर पडलेला आहे . घरातला कर्ता गेल्या ने कुंटुबासमोर उदरनिर्वाह चालवण्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाले. पत्रकारांच्या कुंटुबाला न्याय कोण देणार शासन की लोकप्रतिनिधी पत्रकारांनाही कोणत्याही प्रकारचा पगार नाही ना मानधन नाही लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांचा निधन झाले की त्यांच्या आधारावर जिवन जगणाऱ्या कुंटुबातील आई,वडील, पत्नी, मुले यांचा आधारस्तभ कोण यांच्या कुटुंबाला वाली कोण असा गंभीर प्रश्न पत्रकार बाधंवासह गावा गावातूव होत आहे. पत्रकार बस्वराज वाघमारे यांच्या कुंटुबाला तात्काळ आर्थिक मदत करण्याची मागणी बिलोली पत्रकार संघटनेच्या वतीने होत आहे.
लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या मयत पत्रकारांच्या कुंटुबाला आधार कोणाचा
164 Views