KINWATTODAYSNEWS

दिघी ग्रामपंचायतीची व झालेल्या कामाची सखोल चौकशी करा.-राजुभाऊ गायकवाड

ही.नगर प्रतिनिधी/ तालुक्यातील दिघी ग्रामपंचायत कार्यालय ग्रामपंचायतीला लाखो रुपयांचा निधी मंजूर होऊन सुद्धा दलित वस्तील लोकांना घानीच्या साम्राज्य पासुन सामना करावा लागतो गावात पाण्याची टाकी बसुन एक वर्ष रखडलेले परंतु ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभारामुळे दलित वस्ती पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे, दलित वस्ती सुधार योजना आहे परंतु त्या दलित वस्तीत सुधारणा करण्यासाठी ग्रामसेवक यांच्या कडे अनेक वेळा तोंडी तक्रार केली होती परंतु ग्रामसेवक हे आपला मनमानी पद्धतीने तक्रारी कडे दुर्लक्ष करीत होते, जनसुविधा अंतर्गत झालेल्या काम निकृष्ट दर्जाचे करुन ग्रामसेवक व गुत्तेदार हे आपली टक्केवारी रक्कम कशी वाढवावी या उद्देशाने गुत्तेदार व ग्रामसेवक यांनी जनसुविधा अंतर्गत झालेल्या काम निकृष्ट दर्जाचे करुन शासनाच्या निधीचा विल्हेवाट लावली जात आहे, निवडणूक काळात कर वसुली केलेल्या रक्कमेची पासबुक एन्ट्री केली आहे का त्याची चौकशी करण्यात यावी, चौदाव्या वित्त आयोगाच्या कामातील निधीचा विनियोग कोठे केला आहे त्याची चौकशी करावी आमदार/खासदार यांच्या निधीतून झालेल्या कामाची सखोल चौकशी करून दोषींवर अधिकारी यांच्या वर फौजदारी गुन्हा दाखल करावा व चौकशी करण्यासाठी दिरंगाई केल्यास वरिष्ठ अधिकारी यांच्या कडे तक्रार दाखल करुन चौकशीला दिरंगाई केल्या बद्दल अधिकारी यांच्या वर योग्य ती दंडात्मक कारवाई करावी म्हणून वरीष्ठांन कडे तक्रार करण्यात येईल अन्यथा येत्या पाच दिवसांत पंचायत समिती कार्यालय समोर आमरण उपोषण करण्यात येईल असे निवेदनकर्ते राजुभाऊ किसन गायकवाड यांनी गटविकास अधिकारी यांच्या कडे निवेदन देण्यात आले आहे

186 Views
बातमी शेअर करा