KINWATTODAYSNEWS

शैक्षणिक दृष्ट्या सारा महाराष्ट्र व्यापण्याच्या हेतूने आ.शि.क.संघाच्या चळवळीची झंजावाती वाटचाल

किनवट:
किनवट येथील साई मंदिरात आ.शि.क. संघाच्या प्रकल्प मेळाव्या चे आयोजन केले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री.गणेशराव सानप सर अमरावती हे होते तर मंचावर धारणी प्रकल्प अध्यक्ष श्री.गायकवाड सर,श्री.श्री.उगलमुगले सर,श्री.नखाते सर श्री.हरणे सर आदी मंडळी होती.

गणेशराव सानप सर संस्थापक अध्यक्ष आ.शि.क.संघ..शैक्षणिक दृष्ट्या सारा महाराष्ट्र व्यापण्याच्या हेतूने आदिवासी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघ(आ.शि.क.) ची झंजावाती वाटचाल सुरू आहे असे प्रतिपादन आ.शि.क.संघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री.गणेशराव सानप सरांनी किनवट येथे आयोजीत आ.शि.क.संघाच्या किनवट प्रकल्प मेळाव्यात केले.

पुढे ते म्हणाले की शिक्षक कर्मचाऱ्यांच्या समस्याच समस्या आहेत जर आज आम्ही संघटीत झालो नाही तर काळ आम्हाला माफ करणार नाही, आमचेवर अन्याय होतच राहील त्यामुळे आम्ही संघटीत झालो पाहिजे.हेच संघटनेचे काम साऱ्या महाराष्ट्र भर आ.शि.क.संघ करीत आहे. १६ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता किनवट येथील साई मंदिरात आ.शि.क. संघाच्या प्रकल्प मेळाव्या चे आयोजन केले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री.गणेशराव सानप सर अमरावती हे होते तर मंचावर धारणी प्रकल्प अध्यक्ष श्री.गायकवाड सर,श्री.श्री.उगलमुगले सर,श्री.नखाते सर श्री.हरणे सर आदी मंडळी होती. यावेळी किनवट प्रकल्पाची नवीन कार्यकारिणी सर्वांच्या चर्चे अंती मंजूर केली गेली किनवट प्रकल्प अध्यक्ष श्री.बालाजी कुमरे सर यांची फेर निवड केली गेली.त्यांचे पूर्वीचे काम चांगले असल्याने पुन्हा त्यांना अध्यक्षपदाची संधी दिली गेली.प्रकल्प कार्यकारिणी मधे सक्रिय लोकांना स्थान दिले गेले आहे त्यामधे प्रकल्प संघटक म्हणून श्री.यशपाल जोंधळे सर,उपाध्यक्ष म्हणून भिमराव खाडे,उपाध्यक्ष प्रशांत मेश्राम आदी सक्रिय मंडळी घेण्यात आली आहे.

अकोला,धारणी,किनवट या प्रकल्पांच्या कार्यकारिणी घोषित झाल्या आहेत,पुढील आठवड्यात पांढरकवडा व पुसद या दोन प्रकल्पांची नवीन कार्यकारिणी घोषित केली जाईल असे संस्थापक अध्यक्ष श्री.सानप सरांनी सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकल्प संघटक यशपाल जोंधळे सरांनी केले तर आभार प्रदर्शन प्रकल्प अध्यक्ष बालाजी कूमरे सरांनी केले या मेळाव्याला किनवट प्रकल्पातून बहुसंख्य शिक्षक कर्मचारी मंडळी उपस्थित होती.

190 Views
बातमी शेअर करा