KINWATTODAYSNEWS

देगलूर उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आशा व गटप्रवर्तकाची प्रचंड निदर्शने

देगलूर/प्रतिनिधी : कम्युनिस्ट ,समाजवादी व पुरोगामी पक्ष संघटनाच्या वतीने आयोजित देशव्यापी संपात स्कीर्य सहभागी होऊन नवीन जाचक कृषी कायदे तात्काळ रद्द करणे,कामगार कायद्यातील शिथिलता रद्द करणे,पेट्रोल ,डिझेल, गॅस व जीवनावश्यक वस्तूचे भाव कमी करणे,आशा व गटप्रवर्तक यांना नोकरीत कायम करणे,आशा व गटप्रवर्तक यांना किमान वेतन सामाजिक सुरक्षा प्रदान करणे,आशा ना 18000 व गतपरवर्तक यांना किमान 22000 वेतन सुरू करणे,आशा व गटप्रवर्तक यांचे थकीत वेतन तात्काळ अदा करणे,आशा व गटप्रवर्तक यांना 50 लक्ष रुपयांचे विमा संरक्षण देणे या विविध मागण्यांसाठी आंदोलकांनी देगलूर उपजिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून सोडला होता.

आंदोलनाचे नेत्ररत्व देगलूर बिलोली विकास आघाडीचे निमंत्रक कॉम्रेड प्रा.सदाशिव भुयारे बळेगावकर,भाकपा युनायटेड चे नांदेड जिल्हादयक्ष,कॉ.अंबादास भंडारे,मानवी हक्क अभियानाचे गंगाधर भुयारे,भारतीय पत्रकार संघटनेचे देगलूर तालुकाध्यक्ष, कॉम्रेड चंद्रकांत गजलवार,कॉ,यादव भुयारे,कॉ.यादव गंगाराम भुयारे,कॉम्रेड इर्शाद शेख,राजरत्न ढवळे बळेगावकर,कॉ.गौराबाई विभूते,कॉ. विजया सिंगाडे, कॉ.सुनीता शेवाळे,एम .एन. बिरादार,शकुबाई आंबाटे,भाग्यश्री कुनदाळे,बबिता राठोड,मनीषा वाडीकर, शोभा डोंगरे,दैवशाला गायकवाड, संगीता वाघमारे,लक्ष्मी भाईदौड,संगीता कौठे, श्यामल ठाकूर,पी.एच.सोनकांबळे,सुनीता कांबळे,प्रियंका सळगरे,रुक्मिन बिरादार,अनुसया राजकुंडल,लता नामपल्ले,वंदना धर्मावाड,मंगला शिंदे,शालुका हंदीखेरे,भाग्यश्री मैलोरे, आदींनी केले.

83 Views
बातमी शेअर करा