KINWATTODAYSNEWS

निवृत्तीवेतनाचे अंशराशीकरण किंवा पेन्शन विकणे फायदा की नुकसान?

अनेक सरकारी, निमसरकारी कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत किंवा होणार आहेत.
सेवानिवृत्ती नंतर ४० % पेन्शन विक्रीला सरकारने अनुमती दिली आहे.
बऱ्याच लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे,
पेन्शन विकणे फायद्याचे की नुकसानीचे?
पेन्शन विकावी की विकू नये?
मला अनेकांचे फोन येतात…
म्हणूनच हा प्रयत्न…
निर्णय ज्याचा त्याने घ्यायचा आहे…

नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या
कर्मचाऱ्यांना दरमहा अनुज्ञेय असलेल्या मूळ निवृत्तीवेतनाची ४०% रक्कम,
(पूर्वी ही रक्कम १/३ होती)
ठरलेल्या कॅटलॉग(तक्ता) मधील दरानुसार एकरकमी आगाऊ दिली जाते.
यालाच निवृत्तीवेतनाचे अंशराशीकरण किंवा पेन्शन विकणे असे म्हणतात.
हा दर सेवानिवृत्ती नंतरच्या येणाऱ्या, पहिल्या वाढदिवशी वय किती यावर ठरतो.
५८ व्या वर्षी निवृत्त झाल्यास हा दर ८.३७१ आहे व ६० व्या वर्षी निवृत्त झाल्यास दर ८.१९४ एवढा आहे.
(आपल्याकडे ५८ ला निवृत्ती असल्याने हा दर ८.३७१ हाच आहे.)
पेन्शन विकताना फक्त पेन्शनच्या बेसिक चे पैसे मिळतात.
(त्यावरील डी.ए.( D.A.) मिळत नाही).

पाहूया किती पैसे मिळतात ?

उदा. २८४००×४०÷१००×१२×८.३१ = *११४११३५*
एवढी रक्कम एकरकमी मिळेल.
परंतू दरमहाच्या निवृत्तीवेतनातून ४०% रक्कम वजा करून निवृत्तीवेतन दिले जाईल.
म्हणजेच
२८४००-११३६० = १७०४० एवढे मूळ वेतन व त्यावरील महागाई भत्ता त्या त्या वेळेच्या दराने.
= १७०४०+२०४४=१९०४४. एवढी पेन्शन मिळेल.
(डी.ए.(D.A.) १७%पकडला आहे)
सतत १५ वर्षे यापध्दतीने निवृत्तीवेतन कपात झाल्यानंतर ती व्यक्ती जीवंत असल्यास ही ४०% कापलेली रक्कम पुन्हा निवृत्तीवेतनात वर्ग केली जाते व पूर्ण निवृत्तीवेतन
(फुल पेन्शन) चालू होते.

*पेन्शन विक्रीचे नुकसान*

उदा.
म्हणून २८४०० मूळ निवृत्ती वेतन असणाऱ्या व्यक्तीला किती पैसे मिळतात हे आपण पाहिले.
आता त्याची परतफेड म्हणून एकूण किती रक्कम कापून जाईल.
हे पाहू.
११३६०×१२×१५ = २०४४८००.
याशिवाय या कापून जाणाऱ्या रकमेचा अंदाजे सरासरी डी.ए.( D.A.) ४०% पकडला तरी,
११३६०×४०÷१०० = ४५४० दरमहा.
४५४०×१२×१५ = ८१७२००. म्हणजेच,
२०४४८००+८१७२०० = २८६२०००
एवढी रक्कम १५ वर्षात कापून जाणार आहे.
त्यानंतर फुल पेन्शन चालू होईल.
कापून जाणार. २८६२०००
मिळणारी रक्कम. – ११४११३५
—————
. = १७२०८६५
प्रत्यक्षदर्शी १५ वर्षांनंतर एवढे नुकसान दिसून येते.
हे पेन्शन विक्रीचे नुकसान आहे.

*पेन्शन विक्रीचा फायदा*

आज आपल्याला कमी मिळत असली तरी एकरकमी रक्कम मिळते.
त्यामुळे काहीतरी काम होते. किंवा या रकमेचे जर व्यवस्थित नियोजन केले.
किंवा पोस्टात, बॅंकेत फिक्स ठेवले तरी १५ वर्षात त्या रकमेत बऱ्यापैकी वाढ होईल.
त्यामुळे जास्त नुकसान होणार नाही.
याशिवाय जर यदाकदाचित पेन्शन विकल्यानंतर त्या व्यक्तीचे निधन झाले तर पेन्शन विक्री केल्यानंतर कापून जाणारी ४०% रक्कम कापून जात नाही,
हा सर्वात मोठा फायदा आहे.

आता आपण विचार करायचा आहे….

फुल पेन्शन घेऊन निवृत्तीचे १५/२० वर्षे आयुष्य एन्जॉय करायचं की पेन्शन विकून एकरकमी रक्कम वारसांना देऊन, त्यांना आळशी (परावलंबी) बनवायचं. व आपण स्वत: अगतिक होऊन आपले आयुष्य लवकरच संपवायचे…
ही प्रत्येकाची विचार करण्याची वेगवेगळी मतमतांतरे आहेत.

558 Views
बातमी शेअर करा