किनवट :- कृषी विभाग व आत्मा यंत्रणा किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 15 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 11वाजता सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कार्यालय किनवट येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. आ.श्री भीमरावजी केराम साहेब यांच्या शुभहस्ते झाले.
या महोत्सवास अध्यक्ष म्हणून मा. सहाय्यक जिल्हाधिकारी श्री कीर्ती किरण पूजार (भाप्रसे) हे लाभले तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार श्रीमती मृणाल जाधव उपविभागीय कृषी अधिकारी श्री डी. एम. तपासकर हे उपस्थित होते
रानभाज्यांचा समावेश हा त्या त्या भागातील शेतकऱ्यांचे आहारात होत असतो रानभाज्या मध्ये विविध प्रकारचे शरीराला आवश्यक पौष्टिक अन्नघटक असतात रानभाज्या पूर्णपणे नैसर्गिक आहेत त्यामुळे या संपत्तीचा योग्य वापर आवश्यक आहे शहरी लोकांमध्ये याबाबत जागृती होणे अत्यंत आवश्यक आहे यासाठी हा महोत्सव होईल या महोत्सवांमधून शहरातील ग्राहकांनी थेट शेतकऱ्यांकडून रान भाजी खरेदी केली व अशा नामशेष होत चाललेल्या रानभाज्यांची ओळख झाली याबद्दल ग्राहकांनी कृषी विभागाचे आभार मानले तसेच शैक्षणिक विद्यार्थ्यांनी सुद्धा या रानभाज्या महोत्सवाचा लाभ घेतला आणि नवीन रानभाज्या ची ओळख करून घेतली
कुंजर,पिंपळ , चमकुरा, कर्टूला मिळणार .
या महोत्सवात सर्व प्रकारच्या रानभाज्या कर्तुला ,शेवगा ,घोळ, चवळी ,बांबूचे कोंब, दिंडा, टाळका, पिंपळ, मायाळ, पाथरी, शतावरी अश्वगंधा सावर कंद कळू ,कपाळफोडी, कुरडू ,उंबर, चिवळ ,भुई आवळा इत्यादी कंदभाज्या व सेंद्रिय हिरव्या भाज्या फळे भाज्या व फुल भाज्या रान फळांची व शेतकऱ्यांनी विविध उत्पादित केलेला माल ,सेंद्रिय उत्पादने गूळ, हळद, लाकडी घाण्याचे तेल, गहू सर्व डाळी व भुईमुगाच्या शेंगा ,मुगाच्या शेंगा व केळीचे वेफर्स चे प्रदर्शन व विक्री करण्यात आली या महोत्सवात किनवट प्रधान सांगवी दर सांगवी गोकुंदा पिंपळगाव शिवराम खेडा शनिवार पेठ नागझरी माळबोरगाव आणि परिसरातील शेतकरी सहभागी झाले कार्यक्रमाचे प्रस्तावित तालुका कृषी अधिकारी श्री बी बी मुंडे यांनी केले तर सूत्रसंचालन मंडळ कृषी अधिकारी बुद्धभूषण मुनेश्वर यांनी तर आभार प्रदर्शन आत्माचे शिवप्रकाश पटवे यांनी केले या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी पर्यवेक्षक श्री मामिडवार, श्री भालेवाड कृषी सहाय्यक श्री निळकंठवार श्री दांडेगावकर श्री पी डी जाधव बिडी जाधव ,शेवाळे ,बोंदरवाड शिवा पाटील, देशम वाढ ,अमित पवार, दासरवार ,श्रीमती सरोदे ,श्रीमती बुलबुले ,मोटारिया,ताडेवार, गीते मेश्राम, वाडगुरे ,मेकलवार, खंदारे,चात्रे,कानिंदे, सेंद्रिय शेती करणारे शेतकरी श्री ज्योतिबा गोणारकर श्री निलगीर वार श्री किशोर कोसले यांनी परिश्रम घेतले