किनवट:(आनंद भालेराव)
तालुक्यातील घोटी येथील रामगिरी महाराज मंदिरात नागपंचमीच्या रोजी 26 वर्षापूर्वीची परंपरा कायम ठेवत अखंड ज्योती सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला.यावेळी आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते पूजा व महाआरती करण्यात आली . येथील रामगिरी महाराज मंदिरात मागील 26 वर्षापासून अखंड ज्योति सोहळा नागपंचमीपासून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. सदर ज्योत अखंड ठेवून सतत 37 दिवस दररोज विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. अखण्ड ज्योति सोहळा आज नागपंचमीपासून प्रारंभ झाला. यावेळी आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते पूजा व महाआरती करण्यात आली. यावेळी कुणाल भारती महाराज यांची उपस्थिती लाभली. परिसरातील व गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला. 18 सप्टेंबर रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याचे विस्वस्त मंडळ व गावकऱ्यांनी सांगितले.यावेळी गंगन्ना नेमानिवार, शंकर चाडावार, अजय नेमानीवार, भुमन्ना कांचरलावार, मारोतराव भरकड अनिल पाटील कराळे, लक्ष्मण ठमके, शेंदूपान मुनेश्वर आदी उपस्थित होते.
घोटी येथील रामगिरी महाराज मंदिरात नागपंचमीच्या रोजी 26 वर्षापूर्वीची परंपरा कायम ठेवत अखंड ज्योती सोहळा मोठ्या थाटात संपन्न
115 Views