लकिनवट/प्रतिनिधी:
येथील नगरपरिषदेची दुसरी सुधारित विकास योजना जी आय एस प्रणालीद्वारे तयार करण्याची सुरुवात मंगळवारी दिनांक 10 रोजी झाली.ड्रोन कॅमेरा द्वारे शहराचे संपूर्ण चित्रीकरण करण्यासाठी शहराच्या मथुरानगर येथील पूर्व रिंग रोड येथे आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते पूजन करून ड्रोन द्वारे चित्रीकरण करण्यास सुरुवात झाली. यावेळी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, भाजपाचे शहर अध्यक्ष श्रीनिवास नेमानीवार ,माहूर चे शहराध्यक्ष महामुने, विजय आमले ,नरेंद्र सीरमनवार, नगर रचना सहाय्यक राहुल निकम नगररचना विभागाचे नांदेडचे संकेत पवार नगरपालिका कर्मचारी होती .नवीन तंत्रज्ञान विकसित झाल्याने ते वापरून अचूक आणि तातडीचे काम पूर्ण होईल नवीन सुधारित विकास योजनेमुळे शहराच्या विकासाला गती मिळेल असा विश्वास आमदार केराम यांनी याप्रसंगी व्यक्त केला. यावेळी विकास योजना तयार करण्याचे काम कशा पद्धतीने होईल याची माहिती अभियंता राहुल निकम यांनी दिली.
नगरपरिषदेची दुसरी सुधारित विकास योजना जी आय एस प्रणालीद्वारे तयार करण्याची सुरुवात
113 Views