किनवट/प्रतिनिधी: सफाई कर्मचाऱ्यांना ऑफिस मधील कामे देऊ ऊन वापरून घेत आहे आहेत त्यांना सफाई विभागांमध्येच सफाईचे काम देण्यात यावे नसता 20 ऑगस्ट पासून नगरपालिका कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन करत यांनी म्हटले.
अनिल आडेलू माहुरकर, व्यंकट नर्सिंग मुकनेपिल्लेवार, निखिल तुळशीराम वाघाडे, उमेश ढंडोरे,छाया श्याम ढंडोरे, राकेश भुमन्ना कुंटलवार, तथागत जयवंत येरेकर, राजू केशव तुमलवार,राजु गडचंदावार, ह्या 9 कर्मचाऱ्यांना ऑफिस मधील कामे देऊन वापरून घेत आहेत त्यांची नेमणूक सफाई कामगार म्हणून झालेली असून त्यांना सफाईचे कामे न देता ऑफिसमधील कोणतेही कामे देऊन कामे करून घेत आहेत.
किनवट शहराची लोकसंख्या जास्त असल्यामुळे शहरांमध्ये जागोजागी दुर्गंधी चे प्रमाण वाढत असून कोरोनाविषाणू चे प्रादुर्भाव अजून आटोक्यात आले नसून शहराचे वातावरण धोकादायक झाले आहे. त्यामुळे जे 9 शिपाई कामगार आहेत त्यांना सफाई विभागांमध्ये कामासाठी पाठवण्यात यावे तसेच राजू पिरना ला सफाई ऐवजी सध्या वाहन चालविण्याचे काम देत आहेत आपल्या ऑफिस मध्ये शेख रियाज शेख महंमद वाहन चालक असून त्यांना नीग्रान कारचे काम देण्यात आले आहे.
तरी ह्या 9 सफाई कामगारांना सफाईचे काम न दिल्यास दिनांक 20 ऑगस्ट 2021 रोजी नगरपालिके समोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.