KINWATTODAYSNEWS

विश्वविख्यात साहित्यिक आण्णाभाऊ साठे यांची १०१वी जयंती घुगुस शहरात मोठ्या थाटामाटात उत्साहात साजरी

घुगुस/प्रतिनिधी:
आज दि.०८ऑगस्ट२०२१ रविवार रोजी विश्वरत्न,साहित्यरत्न लोकशाहीर शिवशाहीर,कथाकार,विश्वविख्यात लेखक, आण्णाभाऊ साठे यांची १०१वी जयंती घुगुस शहरात मोठ्या थाटामाटात उत्साहात साजरी करण्यात आली.

या वेळी रा.कॉ.शहर अध्यक्ष सौ.सुशिलाताई सत्यनारायण डकरे यांनी डॉ.आण्णभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे गुलाल पुष्प वाहुन पुजन केले व अभिवादन केले तसेच मा.सत्यनारायण डकरे यांनी ही प्रतिमेचे पुष्पहार घालून प्रतिमेचे पुजन केले व अभिवादन केले तथा समस्त डकरे परिवार आणि तोगरे परिवार यांनी ही अभिवादन केले तसेच महाराष्ट्रातील उभरते कवी डॉ आण्णाभाऊ साठे यांचा साहित्यिक वारसा ऱ्हदयी बाळगणारे त्यांच्या विचारांचा प्रभाव जनसामान्यांत आपल्या लेखणीतून रूजविणारे कवी लेखक श्री शिवहार जाधव हेही यावेळी उपस्थित होते त्यांनी डॉ आण्णाभाऊ साठे यांच्या १०१व्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे गुलाल पुष्प वाहुन पुजन केले तसेच त्यांच्या जीवनावर तथा साहित्याविषयी मनोगत व्यक्त केले आणि मा.सत्यनारायण डकरे यानीही आपले मनोगत व्यक्त केले तसेच मातंग समाजातील लेखनाचा वारसा चालविल्या बद्दल शिवहार जाधव यांचा डकरे परिवारा तर्फे तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महिला अध्यक्षा सौ.सुशीलाताई डकरे यांच्या हस्ते त्यांचा भारतीय सर्वोच्च कायदा भारतीय संविधान व शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मानित सत्कार करण्यात आला.

मन्याड खोऱ्यातील कुरूळा जिल्हा नांदेड येथील व अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे सदस्य तथा अशा एकुण १०१ साहित्यिक समुहाचे सदस्य आहेत शीघ्रकवी शिवहार सिताराम जाधव त्यांचे आजपर्यंत एक हजार कवीता ,पंधराशे चारोळ्या आणि काही कथा लिहिल्या आहेत तसेच पाच पुस्तके प्रकाशित झाले आहेत तिन कवीता संग्रह,एक चारोळी संग्रह आणि एक कथा संग्रह प्रकाशित झाले आहे.

145 Views
बातमी शेअर करा