KINWATTODAYSNEWS

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाने गरीब विद्यार्थीनीची 84 हजार शैक्षणिक फी केली माफ

मुंबई : जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईकरांचे संसार उघड्यावर आले, घरातील सर्व अन्नधान्य, कपडे, पैसे, महत्वाच्या वस्तू पुरात वाहून गेल्या आणि विद्यार्थीनीवर शिक्षण बंद करण्याची वेळ येऊन ठेपली. ही बाब प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांना समजताच तात्काळ त्या विद्यार्थीनीची भेट घेऊन तुझे कोणत्याही परिस्थितीत शिक्षण थांबू देणार नाही हा शब्द दिला आणि आपल्या शैलीने काम करत मुंबईमध्ये नामांकित महाविद्यालयात B.sc. IT TY मध्ये शिक्षण घेत असलेल्या गरीब विद्यार्थीनीची SY व TY अशा दोन वर्षांची 84 हजार शैक्षणिक फी माफ करून सदर विद्यार्थीनीस शिक्षणाचा मार्ग मोकळा करून दिला आहे. निर्मला फाउंडेशन कॉलेज मुंबईने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या मागणीची दखल घेऊन दोन वर्षांची संपूर्ण शैक्षणिक फी माफ केल्याबद्दल निर्मला मेमोरियल संस्थेला आभार पत्र देण्यात आले. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, मुंबई संपर्क प्रमुख दिपक भोगल, महिला पदाधिकारी सुजाता साळवी, बोरिवली महिलाध्यक्षा मेघा मोरे, बदलापूर शहराध्यक्ष नितीन शिंदे, लक्ष्मण सुर्यवंशी, निर्मला मेमोरियल फाउंडेशनच्या संचालिका अरुणा देसाई, प्राचार्या स्विडल डी. कुन्हा, उपप्राचार्य जिग्नेश दलाल, अकॅडमिक डायरेक्टर सिल्विया फर्नांडिस आदी पदाधिकारी उपस्थित होते. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाने विद्यार्थीनीला शैक्षणिक मदत केल्यामुळे पालकांनी संघाचे आभार मानले.

91 Views
बातमी शेअर करा